श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। व्यसन ही मानवी जीवनाला लागणारी किड आहे. ज्यामुळे अनेक सुखी कुटुंबाची दुर्दशा झाली आहे.आर्थिक व सामाजिक ऱ्हास होतांना दिसत आहे.काही लोक दारू पिऊन घरी येतात आणि आपल्या पत्नीला मारतात. लहान वयातच दारु,सिगारेट, गुटखा, अदी व्यसनाने जीवनात अनेक अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे कुटुंबात अशांतता निर्माण होत आहे.

अशा लहान खेड्यात काही गाव गुंडानकडून मुबलक प्रमाणात उपलब्ध करुण दिलेली दारू हा चिंतेचा विषय ठरू शकतो. यासाठी व्यसनापासून दुर होऊन नित्याने सामुदायीक प्रार्थना, ध्यान केले पाहिजे तसेच गावात प्रबोधनाचे कार्यक्रम व सामाजिक चळवळ उभी करणे अत्यंत गरजेचे झाले असल्याचे त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून, चालू राजकीय घडामोडींवर कडाडून टीका केली.प्रा.डाॅ.प्रशांतजी ठाकरे महाराजांनी आपल्या कीर्तनातून लोकांना वास्तव्याची ओळख दाखवून जनतेसमोर प्रेरणादायी विचार सुद्धा मांडले. तर तरुणांना दारुच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

श्री गुरूदेव सेवा सा.प्रा.मंडळ तथा समस्त गावकरी मंडळ करंजी यांच्या संयुक्त विद्यमाने माहूर तालुक्यातील राष्ट्रसंतांच्या पावन परशाने पविञ झालेल्या करंजी या गावात वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त झालेल्या किर्तनातून ते बोलत होते.”लोकांशी जे शिकवावे, आधी आपणचि आचरावे,नुसते पुढारी म्हणोनि मिरवावे, तेणे आदर ना वाढे “आज पुढार्यांनी जर ग्रामगीता हातात घेतली आणि त्यानुसार आचरण केले तर खरोखरच समाजाचे व त्याचे स्वतःचे भले झाल्याशिवाय राहणार नाही.

आज एवढं व्यवसनाचं मोठ संकट संपूर्ण विश्वावर असताना जगभरात, देशभरात जे राजकारण, आरोप प्रत्यारोप सुरु आहे ते अतिशय हीन आहे.” कष्टासाठी कोणीही मरो, प्रतिष्टेसाठी आपणची उरो”हि प्रवृत्ती देशविघातक आणि देशाला मागे नेणारी आहे. म्हणून या प्रवृत्तीला अशा संकटाच्या वेळी जागे करण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंतांचे विचार हि काळाची गरज असल्याचे प्रा.डाॅ.प्रशांत ठाकरे महाराज म्हणाले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त येथील सामुदायिक प्रार्थना मंदिर परिसरात दि.१६ फेब्रु २०२५ रोजी सकाळी ६.०० वा.सामुदायिक ध्यानपाठ व ८.०० वा पालखी मिरवणुक पुजन सोहळा, रामधुन हरी पाठ करण्यात आले असून दुपारी १२.३० वा. श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ करंजी तथा संगित विशारत ताटेवार गुरुजी आणि त्यांचा संच यांनी बहारादार भजनाचा कार्यक्रम केला. तदनंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शनत्पर आपले विचार मांडले सायं. ४.५८ वा. राष्ट्रसंतास श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. रात्री ९.०० वा.प्रा. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांचे दणदणीत किर्तन झाले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी,उपाध्यक्ष दत्तातेय पेटकुले,सचिव बबन पोलसवार, अ.आघाडीचे ता.अध्यक्ष गोपाल गुर्‍हे महाराज,तुळशीरामजी पाटील, ईस्तारी शेंडे, अंबादास मोहुर्ले, मारोती नागा चौधरी, गणपत चौधरी यांनी परिश्रम घतले असून विशेष सहकार्य येथील उपसरपंच संदीप सिद्धेवार व संपुर्ण ग्रा.पं. पदाधिकारी करंजी यांचे लाभले.या कार्यक्रमाचे सुञ संचलन एकनाथ गावञे यांनी केले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version