श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| वाई बाजार येथे माजी आमदार स्व.प्रदीप नाईक यांच्या स्मृती पित्यार्थ 11 स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने खुल्या टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१८ फेब्रु.२०२५ रोजी येथील साई नगरी शिंदे मैदान म.पार्डी रोड येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्‌घाटन किनवट-माहूर विधानसभेचे युवानेते अॅड. अचिंत अरुणकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येथील उपसरपंच उस्मान खान तर प्रमुख पाहूणे म्हणून (उबाठा)शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे,मा.जि.प उपाध्यक्ष समाधान जाधव,मा.जि.प सदस्य बंडु नाईक,काॅग्रेसचे युवा महा.सचिव डॉ. निरंजन केशवे,माहूरचे नगरध्यक्ष फिरोज दोसाणी,सरपंच सिताराम मडावी,स.पो.नी.रमेशजी जाधवर,उबाठाचे उपजिल्हाप्रमुख अनिल रुणवाल,युवासेना जिल्हाप्रमुख यश खराटे,युवानेते वेदांत जाधव,संजय मारवाडे (गणेश कन्स्ट्रक्शन)युवा उद्योजक नितीन पाटील,अतिष गेंटलवार,कञाटदार फिरोज खान,सामाजिक कार्यकर्ते अमजद खान आझाद खान,विलास राठोड गुरुजी,यांचेसह गावातील प्रतिष्ठित नागरिक, क्रिकेट स्पर्धक,क्रीडा प्रेमी, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते महामानवांच्या फोटोचे पुजन व दिपप्रज्वलन करून खुल्या टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे फित कापुन उद्घाटन करण्यात आले.यावेळी उपस्थित पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनातुन खेडाळूंना खेळाचे महत्त्व,यावर प्रकाश टाकला.उद्घाघाटन आटोपताच उद्घाटनिय सामना हा माहुर विरुध्द पानोळा यांच्यात सुरुवात झाला होता. उद्घाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.बी राठोड सर यांनी केले.तर आभार आकाश सातव यांनी मानले.

यावेळी सागर देवकर, आकाश हेंद्रे, सुजीत राठोड, अल्ताफ ढुंगे, शेख मिरान, अहेफान शेख, अलताफ खान, येजास शेख, वाजीद पटेल,हुजेब खान, खलील शेख, आयान शेख, सलमान खान, येजास शेख, तौफिक शेख, ईमरान खान, अवेज शेख, फिरोज शेख, आफताउल रहमान,आयान मनान शेख, परवेज शेख, रफीक शेख, अभिजित केळकर, अभि जाधव, शंतनु खराटे, मुन्ना थोरात, ओंमकार सातव, चेतन जाधव, प्रणव गावंडे. सक्षम खराटे, फारुक खान, जाफर खान, इजाईत खान, असिफ शेख, बिलाल शेख, अवी जाधव, जैद पठाण, अनस पठाण, जिसान शेख,यांचेसह कॉम्ट्रेटर तोफीक शेख,मनोज पवार, अमजद खान हैदर खान तर पंच कमिटी सदस्य अमन पठाण,पंकज बेहेरे, राजू शिंदे, संजय भुरे, सुजित राठोड, अन्सार पठाण, मोसिन खान हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version