Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- Chaturmukhi Ganesh idol : खोदकामात सापडली चतुरमुखी गणेश मूर्ती ; दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी
- Legal awareness : मेंडकी येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन
- Police Raid : कुपटी येथे हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त: पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई
- public Ganeshotsav : सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन
- HSRP number plates : एचएसआरपी नंबर प्लेट 15 ऑगस्टपर्यत बसवून घ्यावी – प्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन
- cleanliness : गावाच्या स्वच्छतेचा मान तुमच्या प्रतिसादावर; SBMSSG2025 ॲपव्दारे सहभाग नोंदवा
- Blocked by ballast : मेट रस्त्यावरील पूलाला पडले भगदाड गिट्टी टाकून बुजवले; पूला खालून जाणारे पाणी चालले पुलावरून
- Meghana Kavali : मोबाईल अॅप्लिकेशनव्दारे स्वच्छ व सुजल गावासाठी सरपंच संवाद
Author: NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी | माहूर शहरातील पौराणिक भोजंता तलावा शेजारी असलेल्या पुरातन भगवान शिव शंकराच्या मंदिरा च्या पायथ्याशी पावसामुळे एक दगड वर आलेले काही नागरिकांना दिसले असता त्यांनी तेथे कुतूहलापोटी खोदकाम केले. त्या खोदकामात चतुर्थ मुखी पौराणिक गणेश मूर्ती दिसल्याने नागरिकांनी या मूर्तीची शिव मंदिराच्या ओट्यावर प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केल्याने या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. माहूर शहर हे पौराणिक ऐतिहासिक शहर असल्याने येथे कुठेही खोदकाम केले असता पुरातन वस्तू सापडतात. येथे अनेक ठिकाण पौराणिक तर किल्ल्यासह इतर वास्तू ऐतिहासिक असल्याने पर्यटक आकर्षित होत आहेत. शहरातील शेवटचे टोक म्हणून श्री देव देवेश्वर संस्थांनच्या मालकीच्या असलेल्या चक्रधर…
श्रीक्षेत्र माहूर| माहर तालुक्यातील व ग्रामीन भागातीलनागरिकांना कायदेविषयक माहिती आणि सुविधा मिळाव्यात या हेतूने जिल्हा विधी सेवा समिती नांदेड, तालुका विधी सेवा समिती माहुर तसेच अभिवक्ता संघ माहुर यांचे संयुक्त विद्यमानाने दिनांक 21.07.2025 रोजी सकाळी 10.00 वा मौजे मेंडकी ता. माहुर येथे कायदे विषयक जनजागृती शीबीर आयोजीत केले असून, या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा समिती नांदेड तालुका विधी सेवा समिती माहूर तसेच अभिवक्ता संघाकडून करण्यात आले आहे सदर शिबीरासाठी माहुर न्यायालयाचे अभिवक्ता संघाचे अध्यक्ष व इतर वरिष्ठ विधीज्ञ तसेच पोलीस स्टेशन माहुरचे वरीष्ठ अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे हजर राहणार असुन नवीन फौजदारी कायदे, दिवाणी कायदे,…
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ एकेकाळच्या नक्षलग्रस्त असलेल्या मौजे कुपटी येथे नाल्या शेजारी चालत असलेला हातभट्टी दारूचा मोठा अड्डा पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः धाडसी कारवाई करून 40 हजाराचे हातभट्टी दारू बनवण्याचे रसायन व साहित्य उध्वस्त केल्याची घटना दि 19 रोजी सकाळी 10 वाजता घडली असून हातभट्टी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत माहूर तालुक्यातील हातभट्टी दारू विक्री करणारे आणि देशी दारूची चोरट्या मार्गाने अवैधरित्या विक्री करणाऱ्या विरुद्ध पोलीस निरीक्षक गणेश कराड हे धाडसी कारवाया करत असल्याने हातभट्टी देशी दारू विक्री…
नांदेड| पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेचा अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारेच 20 जुलै पासून 20 ऑगस्ट 2025 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येतील. सदर स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांविषयी…
नांदेड| ज्या वाहनांची 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहे. त्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही. अशा वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरुन 15 ऑगस्ट 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे यांनी केले आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम,1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या G.S.R. 1162 (E) 04 डिसेंबर 2018 व S.O. 6052(E) दि.06.12.2018 नुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. एचएसआरपी…
नांदेड| स्वच्छ भारत अभियान ग्रामीण 2025 अंतर्गत सुरू असलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात नांदेड जिल्ह्याचा सहभाग वाढवण्यासाठी नागरिकांना पुन्हा एकदा सक्रिय होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गाव पातळीवरील स्वच्छतेचे मूल्यमापन हे नागरिकांच्या थेट अभिप्रायावर आधारित असून, SBMSSG2025 हे अधिकृत ॲप त्यासाठी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले आहे. या ॲपव्दारे नागरिकांना त्यांच्या गावातील शौचालय वापर, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासंबंधी फक्त 13 सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. हे सर्वेक्षण केवळ दोन मिनिटांचा असून, प्रत्येक नागरिकाचा सहभाग गावाच्या रेटिंगवर प्रभाव टाकतो. यासाठी गट विकास अधिकारी, जिल्हयातील सर्वर प्राचार्य, आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा परिषद विभागप्रमुख यांनी समन्वय साधून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे…
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर शहरापासून सारखणीमहामार्गावरून तीन किमी अंतरावर असलेले मौजे मेट या दुर्गम परिसरातील गावाला जाण्यासाठी बनविलेल्या रस्त्यावरील नळकांडी पुलाखालील नळकांडे फुटल्याने सदरील पूल जीव घेना बनला होता. नागरिकांनी यापुलाला पडलेल्या भगदाडाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने या पूलाची उंची वाढवून नवीन पूल बनविणे ऐवजी या फुलाला पडलेले भगदाड गीट्टी टाकून बुजविल्याने पुलाखालून जाणारे पाणी पुलावरून जात असल्याने वाटसरूंच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. माहूर तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाला लागून खेड्यापाड्याला जाणारे अंतर्गत रस्ते निकृष्ट दर्जाचे बनविल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले असून, अनेक ठिकाणी उंची वाढवून पिलर चे पूल बनविणे ऐवजी नळकांडे टाकून त्यावर मुरूम टाकून…
नांदेड| स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत गावे हागणदारीमुक्त ठेवून त्यांना अधिक आदर्श आणि टिकाऊ बनविण्याचा केंद्र व राज्य शासनाचा प्रयत्न सुरू आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आणि ग्रामपातळीवरील जनसहभाग वाढवण्यासाठी सरपंच संवाद हे नाविन्यपूर्ण मोबाईल अॅप्लिकेशन सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे. सरपंच संवाद हे अॅप्लिकेशन केंद्र शासनाच्या वतीने क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. या अॅपव्दारे सरपंच आपल्या गावातील स्वच्छता व ग्रामविकासाचे उपक्रम पोस्ट स्वरूपात शेअर करू शकतात. तसेच इतर गावांतील उत्तम कामांची उदाहरणे पाहता येतात,…
नांदेड| दिवसेंदिवस शिक्षणामध्ये आमुलाग्रह बदल घडत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.) मुळे शिक्षणक्षेत्रात मोठा बदल घडत आहे. जगभरात जे अभ्यासक्रम सुरू आहेत, तेच अभ्यासक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांमध्ये देण्यात यावेत. आणि ते देण्यासाठी विद्यापीठाने जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी स्वतःला अद्यावत ठेवावे, असे मत महाराष्ट्र राज्याची माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार मा. अशोकराव चव्हाण साहेब यांनी व्यक्त केले. ते आज दि.१४ जुलै (सोमवार) रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रातर्फे “मराठवाड्यातील सामाजिक आर्थिक विकास: समस्या व उपाय योजना” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी विचारपीठावर त्यांच्या समवेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे…
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी आज दि.१६ जुलै रोजी एक ऐतिहासिक पाऊल उचलत नासकॉम आणि स्किल फॅक्टरी लर्निंग प्रा. लि., पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार (MoU) केला. उद्योग-शैक्षणिक सहकार्य अधिक बळकट करून कौशल्य विकासाला चालना देण्याच्या हेतूने झालेल्या या करारामुळे विद्यापीठाच्या सुमारे ४०० संलग्न महाविद्यालयांतील १.५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे. या सामंजस्य करारांतर्गत डिजिटल १०१ – ३० तासांचा (STEM व Non-STEM) अभ्यासक्रम, मोफत इंटर्नशिप व अपरेंटिसशिप संधी, उद्योग-आधारित प्रशिक्षण व प्लेसमेंटसाठी थेट संपर्क आणि आधुनिक नोकरी बाजारासाठी आवश्यक कौशल्य विकास या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये प्रमुख उपस्थिती विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ.…