श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर शहरातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा सोनापीर दर्गाह या पौराणिक वास्तूची दुरुस्ती करावी अशी मागणी दर्गाह चे मुतवल्ली शेख बाबर फकीर मोहम्मद यांनी संचालक डॉ तेजस म. गर्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

याची दखल घेत संचालकांनी सहाय्यक संचालक अमोल गोटे यांचे सह कलेक्टिव्ह प्रॅक्टिस कंपनीच्या नागपूर येथील आर्किटेक्ट आणि पुरातत्व विभागाचे कंत्राटदार वैजनाथ फड मामा यांचे सह सोनापीर बाबा दर्गाहच्या दुरुस्तीसाठी दि 22 रोजी पाहणी केली. सोबतच शहरातील पुरातत्व विभागा कडे असलेल्या सर्व वास्तूंची पाहणी केल्याने भाविका सह नागरिक आणि दर्गाह कमिटी कडून समाधान व्यक्त होत आहे.

माहूर शहरात असलेल्या बाबा सोनापीर दर्गाह ची ख्याती सर्व दूर पसरलेली असल्याने येथे वर्षभरात लाखोच्या संख्येने सर्व धर्मीय भाविक मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होण्यासाठी येत असतात. मार्च महिन्यात सालाना उर्सचे आयोजन होत असल्याने या उरसात कवालीचे कार्यक्रम सर्वधर्मीय कार्यक्रम कुस्त्यांच्या दंगली मनोरंजनाची साधने आणि सर्व वस्तू मिळण्याची दुकाने लागत असल्याने उर्सा च्या पाच दिवसात पाच लाखावर भावीक येथे येतात. तर दर महिन्याच्या पाच तारखेला छोटा ऊर्स भरत असल्याने यावेळी हजारोच्या संख्येने भावी घेतात.

त्यामुळे सोनाबीर बाबा दर्गाहाचा 19 एकर चा परिसर अद्यापही भकासच असल्याने मुतवल्ली बाबर भाई यांनी सर्व संबंधिताकडे सोनापीर बाबा दर्गाहाच्या मुख्य इमारती मधून पावसाळ्यात पाणी गळत असल्याने त्या इमारतीची दुरुस्ती करावी. आणि परिसरातील विकास कामासाठी 100 कोटीचा निधी मिळावा अशी मागणी केली होती. याची दखल घेत पुरातत्व विभागाचे संचालक डॉ तेजस गर्गे यांनी नांदेडचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांना पत्र देऊन तात्काळ पाहणी करत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने त्यांनी येथे भेट देऊन पाहणी केली.

यावेळी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक नांदेड अमोल गोटे कंत्राटदार वैजनाथ फड मामा कलेक्टिव्ह प्रॅक्टिस कंपनीच्या आर्किटेक्ट शिवानी शर्मा देवेश चींधे कर्मचारी सय्यद मसूद अन्सारी पहारेकरी दिनेश कोंडे राखणदार सय्यद आजम यांचे सह कर्मचारी उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version