श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील मौजे महादापूर येथील पैनगंगा नदीला जोडलेल्या नाल्यातून वाळू भरून ईवळेश्वर कडे नेण्याच्या तयारीत नदीपात्रात उभा असलेल्या ट्रॅक्टरला पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदीप अन्येबोईनवाड यांचेसह पोलिसांनी जाय मोक्यावर पकडून माहूरच्या पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केल्याची घटना दि 12 रोजी दुपारी 10.40 वाजता घडली आहे.

पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी संदीप अन्येबोईनवाड जमादार पो ना प्रकाश गेडाम पोका ज्ञानेश्वर खंदाडे पो का संघरत्न सोनसळे गोपनीय शाखेचे गजानन जाधव हे तपास कामी महादापूर वरून वरून पुढे जात असताना त्यांना नाल्यातून वाळू भरून नेत असताना ट्रॅक्टर दिसल्याने त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने ट्राली नाल्यातच सोडून ट्रॅक्टरचे मुंडके घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यास रंगे हात पकडून माहूरच्या पोलीस ठाण्यात आणून जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे वाळू तस्करात दहशत पसरली असून कुठल्याही प्रकारची चोरी खपवून घेणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी यावेळी दिला आहे.

घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदीप अन्येबोईनवाड यांचे सह पोलीस करत असून, वाळू तस्कर सततच्या पावसाचा फायदा घेत नाल्यातून वाळू तस्करीकरण्याच्या प्रयत्नात असल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दोन्ही वाहनाद्वारे पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावात रात्रंदिवस पेट्रोलिंग वाढविली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version