श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| दि 22 रोजी पासून माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात भक्ती भावाचा संपन्न होणाऱ्या नवरात्र उत्सव निमित्त अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत त्यांनी उपस्थित सर्व विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांना भाविकांच्या सेवेत कमी पडू नये यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी नवरात्रोत्सवात भाविकांना अडचण येऊ नये यासाठी 40 अधिकारी 400 पोलीस महिला पुरुष कर्मचारी आणि 300 महिला पुरुष होमगार्ड सेवा देणार आहेत असे सांगितले यावेळी आगारप्रमुख चीबडे यांनी 120 एसटी बसेस द्वारे भाविकांना गडावर ने आण करण्यासाठी सज्ज राहणार आहे असे सांगितले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघने, पोलिस निरीक्षक गणेश कराड, सहाय्यक महसूल अधिकारी संतोष पवार, तालुका आरोग्य अधिकारी राजेश माचेवार, मुख्याधिकारी विवेक कांदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ किरणकुमार वाघमारे, संस्थान व्यवस्थापक योगेश साबळे, प्रभारी उप कार्यकारी अभियंता सा बा साहेबराव भिसे, परशुराम मंदीर कडे जाणाऱ्या पायऱ्यांचे काम १९ तारखे पर्यंत पुर्ण करू असे आश्वासन दिले.
पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी शहरातील बंदोबस्त गडावर जानारे खाजगी वाहणे बंद करण्यात येणार असून, हरवलेल्या व्यक्त किंवा इतर तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले. रेणुका संस्थान पाणी सिसि टीव्ही जिवरक्षक लाईट भाविकांना महाप्रसाद यासह इतर बाबीवर यात्रा काळात महसूल विभाग नियंत्रक ठेवणार असल्याची तहसीलदार अभिजीत जगताप यांनी सांगितले यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी विश्वस्त संजय कान्नव यांचे सह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.