श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील बांधकाम व इतर नोंदणीकृत कामगारांना भांडे संच देण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त आणि त्यांच्या पुरवठादारांनी तीन वेळा माहूर ते नांदेडच्या केंद्रा वर चकरा मारायला लावूनही भांडे संच न दिल्याने शेकडो कामगार ताटकळत ठेवले. हि बाब मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांचे कानी पडताच त्यांनी तात्काळ सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय गाठून जाब विचारत कामगारांचे गावी जाऊन भांडे संच वाटप करण्याचे सांगितले तसे न केल्यास मनसे रस्त्यावर उतरेल व आपल्या शैलीत पुरवठादारास वठणीवर आनेल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी यावेळी दिला.
माहूर तालुक्यातील शेकापूर केरोळी रूई लांजि सातघरी हडसनी आणि इतर गावातील बांधकाम कामगार व इतर कामगारांना उपयुक्त कार्यालयाचे भांडे संच वाटप करणाऱ्या ठेकेदाराने नांदेड येथे दोन वेळा बोलावले. त्यावेळी भांडे संच न दिल्याने महिला पुरुष कामगारांची हेळसांड होत घडाइपेक्षा मढाई जास्त होत असल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी उपायुक्त यांची भेट घेतली. दि 12 रोजी भांडे संच देण्याचे कबूल केल्याने शेकडो कामगार स्वखर्चाने तिसऱ्या वेळी उपायुक्त कार्यालय नांदेड येथे आले असता येथे कार्यालयाला कर्मचाऱ्याकडून उडवा उडवी चे उत्तर देण्यात आले. ठेकेदार गायब दिसला त्यामुळे रवि राठोड यांनी उपायुक्त कार्यालय गाठून कामगारांच्या गावी जाऊनच आता संच वाटप करावे अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
माहूर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगार सह इतर कामगारांना त्यांच्या गावी जाऊन भांडे संच व इतर सर्व साहित्य वाटप करावे अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड कामगार नेते कॉम्रेड गंगाधर गायकवाड अर्थ मीडियाचे संचालक नकुल चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष योगेश्वर मोरे कामगार जिल्हाध्यक्ष धम्मपाल आढाव मनसे सैनिक सुरज यांचे सह बांधकाम कामगार सह इतर कामगार महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.