श्रीक्षेत्र माहूर| आमदार भीमराव केराम यांचे खंदे समर्थक प्रतिष्ठित व्यापारी तथा नगरसेवक गोपु उर्फ सागर शोभाताई सुधिर महामुने यांची भारतीय जनता पक्षातर्फे माहुर शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
गोपु महामुने हे भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांनी विधानसभा निवडणुक काळात आमदार भीमराव केराम यांच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळत कार्मकर्त्यांना सोबत घेऊन अहोरात्र मेहनत घेतली होती आमदार भीमराव केराम यांच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. माहुर शहरासह तालुक्यात पक्षवाढीसाठी मोलाचे योगदान आहे.त्यांच्या कार्याची दखल घेउन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी भारतीय जनता पक्ष माहुरच्या शहराध्यक्षपदी निवड केली.
त्यांच्या निवडी बद्दल भाजपा नेते ॲड.रमण जायभाये,तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के, जेष्ठ कार्यकर्ते विजय आमले, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र केशवे,नंदकुमार जोशी,जोतिराम राठोड, किसनराव गवळी, विलास चौधरी पाटील, बंन्सगोपाल आग्रहारी, राजु मुडाणकर,अनिल वाघमारे, नंदु कोलपवार, किसनराव गवळी,मनोहर भगत,अशोक माळेकर, रामभाऊ द्रोंशेट्टीवार.जीवन अग्रवाल, संजय बनसोडे,माजी जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड,शामराव कुमरे, राम कीसन केंद्रे,किनवटचे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,सौ पद्माताई गीरे, सौ.अर्चना दराडे, शहराध्यक्षा सौ.स्वातीताई आडे,विकास खरे, अविनाश भोयर,यांचेसह अनेक मान्यवरांनी त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला.
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी तन मन धनाने प्रयत्न केले तसेच निष्ठेने पक्षावाढीसाठी काम केले व पुढेही अधिक जोमाने पक्षाचे काम करीत राहणार पक्षाने माझे वर सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही . गोपु महामुने, शहराध्यक्ष तथा नगरसेवक माहुर.