श्रीक्षेत्र माहूर| माहर तालुक्यातील व ग्रामीन भागातीलनागरिकांना कायदेविषयक माहिती आणि सुविधा मिळाव्यात या हेतूने जिल्हा विधी सेवा समिती नांदेड, तालुका विधी सेवा समिती माहुर तसेच अभिवक्ता संघ माहुर यांचे संयुक्त विद्यमानाने दिनांक 21.07.2025 रोजी सकाळी 10.00 वा मौजे मेंडकी ता. माहुर येथे कायदे विषयक जनजागृती शीबीर आयोजीत केले असून, या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा समिती नांदेड तालुका विधी सेवा समिती माहूर तसेच अभिवक्ता संघाकडून करण्यात आले आहे
सदर शिबीरासाठी माहुर न्यायालयाचे अभिवक्ता संघाचे अध्यक्ष व इतर वरिष्ठ विधीज्ञ तसेच पोलीस स्टेशन माहुरचे वरीष्ठ अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे हजर राहणार असुन नवीन फौजदारी कायदे, दिवाणी कायदे, महिला व बालकांसंबधी व इतर कायदया संबंधाने मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबीरास मेंडकी व परीसरातील जनतेनी ज्यास्तीत ज्यास्त संख्येने उपस्थित राहुन शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहण अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती व दिवाणी व फौजदारी न्यायालय प्रथम वर्ग माहुर यांनी केले आहे.