श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| श्रीक्षेत्र माहूर गडावर पुढील महिन्यात साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सव या महामहोत्सवासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीथ चंद्रा दोंतूला यांच्या अध्यक्षतेखाली दि 29 रोजी बैठक घेण्यात आली या बैठकीत नवरात्र उत्सव काळात येणाऱ्या भाविकांच्या आरोग्यालाबाधा पोहोचणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन उपस्थित सर्व विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंतूला यांनी केले.
या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतूला यांचे सह तहसीलदार अभिजीत जगताप गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस पोलीस निरीक्षक गणेश कराड नगराध्यक्ष फिरोज दोसानी नायब तहसीलदार कैलास जेठे नायब तहसीलदार श्रीमती अरुणा सूर्यवंशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डी के भिसे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ किरण कुमार वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर डी माचेवार मरविम कंपनीचे अभियंता आर बी शेंडे एसटी महामंडळाचे सी आर समर्थवाड माहूर न प चे कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड नको चे अभियंता गिरीश डूबेवार विस्तार अधिकारी रमेश गावंडे डॉ अभिजीत आंबेकर तलाठी चंद्रकांत बाबर महसूल सहाय्यक प्रभू गावंडे श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त संजय कान्नव क अभियंता पी व्ही हंचाटे व्यवस्थापक योगेश साबळे वन विभागाचे वनपाल मनोहर कत्तुलवार श्री दत्त शिखर संस्थांनचे लेखापाल प्रकाश गायकवाड यांचे सह देवस्थानचे प्रतिनिधी गडावरील व्यापारी पत्रकार पोलीस मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत या नवरात्र महोत्सवात लाखो भावीक येणार असल्याने उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडत भाविकांच्या आरोग्याला बाधा पोचणार नाही तसेच त्यांची सुरक्षा व्यवस्था महाप्रसाद तसेच एसटी महामंडळाने त्यांना गडावर पोहोचविण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत मरावीमने विद्युत पुरवठा खंडित होऊ देऊ नये तसेच सर्व विभाग प्रमुखांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशा सूचना यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतुला यांनी दिल्या.