हिमायतनगर,अनिल मादसवार | “जय जवान जय किसान… जान देंगे जमीन नहीं”, “जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” अशा घोषणांनी कामारी परिसर रविवारी दणाणून गेला. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प व पैनगंगा धरणाच्या विरोधात हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे भव्य महाएल्गार सभा पार पडली. नुकत्याच आलेल्या पुरामुळे गावाला वेढा घातलेल्या हनुमान मंदिर परिसरात ही सभा आयोजित करण्यात आली होती.

oplus_0

“धरण म्हणजे तुमचं आमचं मरण आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्या” असे आवाहन मार्गदर्शक वक्त्यांनी केले. निगनूर येथे होऊ घातलेला सहस्त्रकुंड प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, पर्यायाने सिंचनासाठी नदीवर छोटे-छोटे बॅरेजेस बांधावेत व सौरऊर्जेतून वीज निर्मिती करावी, असा ठाम संदेश शासनाला देण्यात आला.

oplus_0

सभेतील मान्यवर व मार्गदर्शक
महाएल्गार सभेच्या अध्यक्षस्थानी कोंडाबाराव शिरफुले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रल्हादराव जगताप पाटील (अध्यक्ष – निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती), मुबारक तवर (माजी उपाध्यक्ष, यवतमाळ जिल्हा परिषद), प्रल्हाद गावंडे सर, डॉ. अविनाश खंदारे, डॉ. रेखाताई पाटील चव्हाण, प्रकाश पेंदे, दिनेश रावते, प्रा. संध्याताई कदम, चक्रधर पाटील देवसरकर आदी उपस्थित होते. तर मान्यवर पाहुण्यांमध्ये माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, स्वराज्य पक्षाचे माधवराव पाटील देवसरकर, कृष्णा पाटील आष्टीकर यांचा समावेश होता. गायक सुनील चव्हाण यांनी प्रेरणादायी गीतांनी शेतकऱ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला.

oplus_0

शेतकऱ्यांचा ठाम इशारा
सभेत मार्गदर्शक वक्त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांनुसार, या प्रकल्पामुळे सुमारे ४० गावांतील हजारो हेक्टर सुपीक जमीन पाण्याखाली जाणार असून, शेतकरी, शेतमजूर व गावकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे “शेतकरी राजा जागा हो, सहस्त्रकुंड प्रकल्प रद्द झाला पाहिजे” असा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. सभेला विदर्भ-मराठवाड्यातील बुडीत क्षेत्रातील हजारो शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांनी उपस्थित राहून धरणविरोधी संघर्षाला भक्कम पाठिंबा दिला.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version