श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होणार असल्याने पोलीस विभागाकडून शहरातील बालाजी मंगलम येथे दि 25 गणेश भक्त अधिकारी पदाधिकारी यांची शांतता बैठक घेण्यात आली या बैठकीत तहसीलदार अभिजीत जगताप नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करण्याचे आवाहन केले तर या बैठकीत गणेश भक्तांनी शहरातील मिरवणूक मार्गावर असलेले अतिक्रमण तात्काळ काढण्याची मागणी केली.

माहूर शरद झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी माहूर शहरात साजरा होणार यावर्षीचा गणेशोत्सव डीजे मुक्त व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली सोबतच गणेश भक्तांच्या सूचना ऐकताना गणेश भक्तांनी शहरातील वाढलेले अतिक्रमण तसेच अवैध बांधकाम यासह इतर समस्यांची मांडणी केल्याने नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना मान खाली घालावी लागली यावेळी तहसीलदार अभिजीत जगताप उपविभागीय अधिकारी रामकृष्ण मळघणे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी पोलीस निरीक्षक गणेश कराड मरावीमचे अभियंता शेंडे उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांचे सह मान्यवरांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली सोबतच पैनगंगा नदी पत्रावर जाऊन गणेश विसर्जन स्थळाची पाहणी करून कर्मचाऱ्यांना दुरुस्तीबाबत सूचना दिल्या.

गणेश मंडळ भक्तांना उपस्थित अधिकाऱ्यांनी गणेश मंडळासमोर विविध देशभक्तीपर कलाकृती सादर करून समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्याचे आवाहन करत गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करावा असे आवाहन केले यावेळी विसर्जन मार्गावर लोंबकळलेल्या तारा दुरुस्ती करण्याची सूचना आली असता मराविमचे अभियंता शिंदे यांनी सर्व तारा दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड अभियंता विशाल ढोरे रोहित डुकरे स्वानंद मामीलवाड मझहर शेख विजय शिंदे गणेश जाधव यांचे सह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील गणेश मंडळाचे कार्यकर्ते गणमान्य नागरिक उपस्थित होते.

ब्रिटिश राजवटीत भारतीय नागरीकांवर होत असलेले अन्याय अत्याचारा विरोधात जनतेला जागे करुन जनतेला एकत्रित करण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या गणेश उत्सवाचे महत्व, पावित्र्य, संस्कृती, जनतेच्या भावना जोपासत गणेश उत्सव शांततेत पार पाडुन प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी केले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version