जेसीबी द्वारे जंगलात नवीन रस्ता बनवत नेत आहेत रोपे

वन विभाग माहूरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

काम न करता बिले उचलल्याचे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून वन विभागाचा आटापिटा

श्रीक्षेत्र माहूर,इलियास बावानी| माहूर तालुक्यातील मौजे शेख फरीद बाबा दरगाह समोरील रस्त्यावर फेकून देण्यात आलेली रोपे आणि त्यासंबंधीचे वृत्त प्रकाशित होताच वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर रोपे रात्रीला ट्रॅक्टर मध्ये भरून जेसीबी द्वारे पहाडावर नेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडूभाऊ राठोड पालाईगुडाकर यांनी जंगलात जाऊन पाहणी केली असता जंगलात उभी असलेली अनेक सागवानी झाडे तोडून नवीन रस्ता बनवत जेसीबी द्वारे ट्रॅक्टर ओढत नेऊन खड्डे न करताच फेकण्याचा प्रयत्न करताना दिसून आल्याने संबंधित प्रकरणात दोशी अधिकारी कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे.

वनविभा गाकडून चार वर्षांपासून लाखो रोपे जंगलात लावण्यासाठी अनेक ठिकाणी रोपवाटिका तयार करून निधी ची उचल केली असून रोप लागवड करणे शेतकऱ्याचे शेत भाड्याने घेणे त्यावर मजूर ठेवणे पावसाळा सुरू होताच विविध ठिकाणी सदरील रोपे लागवड करणे खड्डे करणे यासह विविध कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उचल केलेला आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात रोपवाटिका तयार करण्यात आल्या त्यांनाही भाड्याची रक्कम न देता तसेच वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असून त्यांच्या रकमेची उचल करण्यात आल्या. प्रकरणी बिंग फुटू नये म्हणून तक्रारदार शेतकऱ्यांना थोपवून ठेवने मजुराच्या नावावर खड्डे करण्याची रक्कम उचलून जेसीबी द्वारे खड्डे करणे व इतर कामे करणे यासंबंधी अनेक वेळा तक्रारी होऊन वृत्तपत्रात बातम्याही प्रकाशित झालेल्या आहेत.

यासंबंधी जिल्हा वन अधिकारी केशव वाबळे यांच्याकडेही अनेकांनी तक्रारी केल्या परंतु माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव आणि जिल्हा वन क्षेत्र अधिकारी हे गेल्या चार वर्षापासून मिली जुली सरकार चालवत निकृष्ट कामांची मालिका चालवत आहेत. यांना अभय कोणाचे हे कळायला मार्ग नाही नागरिकांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे ही तक्रारी केल्या. परंतु सर्व तक्रारीतील दम नांदेड येथील जिल्हा वन अधिकारी केशव वाबळे यांच्या कार्यालयात येऊन तुटत असल्याने एकाही तक्रारीची रीतसर चौकशी झालेली नाहीं. 

माहूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले असून चार ते व पाच वर्षापासून ठाण मांडून बसलेले अधिकारी कर्मचारी माहूरलाच का थांबतात हे न ऊलगडणारे कोडे असल्याने पालकमंत्री अतुल सावे यांचे सह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहायक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंथूला तहसीलदार अभिजीत जगताप यांनी जंगला प्रति थोडीशी आस्था दाखवून चार वर्षाच्या कारभाराची चौकशी केल्यास मोठे घबाड उघडकीस येईल यात शंका नाही असे मतही सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडूभाऊ राठोड पालाईगुडाकर यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version