श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्राला लागून असलेले मौजे धानोरा या ठिकाणी नदीपात्रातून ट्रॅक्टर द्वारे वाळू चोरी होत असल्याची खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्याने तहसीलदार मुगाजी काकडे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंथूला यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहीसाठी गेले असता वाळू तस्करांनी पाचही ट्रॅक्टर नदीपात्रातील पाच ते सहा फूट पाण्यातून विदर्भात पळवून नेल्याची घटना दि 15 रोजी दुपारी 2.00 वाजता घडली होती या पाच पैकी चार ट्रॅक्टर पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी आणून जप्त करत गुन्हा दाखल केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
आज दिनांक 15/07/2025 रोजी दुपारी 02.00 वाजताचे सुमारास तहसिलदार मुगाची काकडे यांना तलाठी सज्जा दिगडी अंतर्गत धानोरा गावाजवळ पैनगंगा नदिपात्रातील वाळू उपसा करुन क्ट्रक्टरमध्ये भरुन चोरी करत आहेत. अशी माहिती मिळाल्यावरुन तहसिलदार मुगाजी काकडे यांचेसोबत शंकर मल्लारी चंदणकर मंडळ अधिकारी वानोळा विलास लक्ष्मण शेडमाके धानोरा येथे गेल्यानंतर पोलीस पाटील बालाजी गोविंद कवाने यांच्यासोबत नदीपात्रात जाऊन ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न केला होता पण परंतु सदरील ट्रॅक्टर पळून गेले होते.
दि 15.07.2025 रोजी दुपारी 03.00 वाजताचे सुमारास ट्रक्टर क्रमांक एमएच 29 टीई 0212, एमएच 38 बी 1080 व पासींग क्रमांकर नसलेले तीन ट्रक्टर असे एकुन पाच ट्रक्टरचे चालक मालकांनी विनापरवान अवैद्यदित्या पैनगंगा वाळू चोरी करताना पकडण्यासाठी गेले असता पळवून नेले अशी तक्रार मंडळ अधिकारी पेंटेवाड यांनी दिल्याने माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू तस्करांनी लपवून ठेवलेले पाच पैकी चार ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात आणून जप्त केले आहेत. वाळू तस्करांनी वाळू चोरी केल्यास वाहन जप्ती दंड आणि गुन्हे दाखल होतील असा इशारा पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी यावेळी ट्रॅक्टर चालक मालकांना दिला आहे
यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कराड सपोनी पालसिंग ब्राह्मण सपोनी संदीप अन्येंबोईनवाड पोहे का गजानन चौधरी पोहेका बाबू जाधव चालक ज्ञानेश्वर भोपळे पोका पवन राऊत सोनटक्के जाधव पोहेका पुष्पा पुसणाके पोका राठोड यांचे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.