नांदेड| 13 जुलैला रविवारी सकाळी 11वाजता वजिराबाद चौकात लंगर सहाब गुरूद्वाराचे मुख्य जत्थेदार मा. संत बाबा बलविंदर सिंघजीनी उ.म.प्रा.वि.फेस्काॅम नांदेडच्या “आषाढी लक्षवेधी मागणी महा मोर्चा व उघडा डोळे पहा नीट ठिय्या अंदोलनास” हिरवी झेंडी दाखविली. मोर्चात जाणकारांच्या मते दहा हजारा पेक्षाहि जास्त गरिब,गरजवंत, दूर्लक्षित,उपेक्षित,वंचित,निराधार,शेतकरी,शेत मजूर,कष्ट करी, कामगार, विधवा माता तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला.
मोर्चा वजिराबाद मुथा चौक-राजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा करून मा.जिल्हाधिकारी कार्यालया समोर अत्यंत स्वंशिस्तीत,शांततेने निर्विघ्न पणे पोहचला. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती हे विशेष पाऊस नव्हता. रिकाम्या पोटाची आतून भूकेची धग,वरून ऊन्ह,खालून तापलेल्या जमिनीवर सर्व हजारो मोर्चार्थी सुहृदयी स्थानिक लोकप्रति निधी,शासनाचे प्रतिनिधी, आमदार,खासदार,पालक मंत्री महोदयांची चातका प्रमाणे वाट पहात होती!
.
महायुतीच्या नेत्यांच्या योग्य वेळिच्या मध्यस्थिने ज्येष्ठ नागरिक उ.म.प्रा.वि.फेस्काॅम नांदेडच्या अंदोलनाची यशश्वी सांगता तथा अमरण उपोषणाची स्थगीती देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालया समोर जाणकारांच्या मते दहा हजार पेक्षाहि जास्त गरिब गरजवंत लक्ष वेधी महामोर्चा व अंदोलन कर्ते ज्येष्ठ नागरिक अन्न-पाण्याविना तळपत्या लाही-लाही प्रखर ऊन्हात तब्बल चारतासाहून अधिक काळ लक्षवेधी “उघडा डोळे,पहा नीट ठिय्या अंदोलन करत ऊपोषणास बसलेले होते.
आयोजक अध्यक्ष डाॅ हंसराज वैद्य,सचिव प्रभाकर कुंटूरकर,महिला मोर्चा अध्यक्षा डाॅ.लक्ष्मी पुरणशेट्टीवार, समन्वय समिती अध्यक्ष रामचंद्र कोटलवार,डाॅ.अशोक चिन्नावार किनवट,माथाडी मोर्चाध्यक्ष सय्यद मौला,किर्तनकारआनंदराव पाटील,अनेक मोर्चार्थी महिला पूरूष यांचे प्रबोधन तथा गाणीं चालू अस्तांना नांदेडचे विकास पूरूष खा.अशोकरावजी चव्हाण साहेबांचा निरोप घेऊन दूत आमदार अमर भाऊ राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके पाटील बोंढारकरांच्या अंदोलन स्थळी यशश्वी मध्येस्थीने व ज्येष्ठ नागरिकांचे फेस्काॅम अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे मुंबई यांच्या निरोपावरून तथा नांदेडभूषण,उ.म.प्रा.वि.फेस्काॅम नांदेचे अध्यक्ष डाॅ.हंसराज वैद्य यांच्या अदेशाने अंदोलनाची सांगता झाली.