हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुकयातील मौजे चिचोर्डी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या जिरोना गट ग्रामपंचायतच्या गणेशवाडी व गणेशवाडी तांडा गावाला गेल्या आठ ते दहा दिवसांपासून संसर्गजण्य आजाराने घेरले आहे. गणेशवाडी तांड्यातील नागरीकांना विविध आजाराचा सामना करावा लागतो आहे. (Himayatnagar talukyathil Girona – Ganeshwadi Gawala chicken gunnyachya sathi surrounded by dengue) जिरोना गावांमध्ये तिन डेंग्यू रूग्ण आढळून आले असून, ताप, अंगदुखी, खाज, सांधेदुखी यासह अन्य आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. आरोग्य विभागाने गावभेटी देऊन पावसाळ्यापूर्वी जनजागृती केली नसल्याने हि परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. दरम्यान यातील काही रूग्णांच्या रक्ताचे नमुने आरोग्य विभागाने घेतले असुन, वैधकीय तपासणी करीता पाठवले असल्याचे सांगण्यात आले आहे.

एकूणच पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्यानंतर ग्रामपंचायतीने व आरोग्य विभागाने गावागावात जनजागृती करून धर फवारणी करत डासांचा बंदोबस्त करणे क्रमप्राप्त आहे. मात्र याकडे अक्षमय दुर्लक्ष झाल्यामुळे नागरीकासह अबालवृद्ध तापीच्या साथीसह अन्य आजाराने त्रस्त होऊन नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आच कांहींसा प्रकार हिमायतनगर तालुक्यातील जिरोना गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, येथील नागरीकाच्या बाबतीत पुढे आला आहे. या गावात तापीसह अन्य आजाराने नागरिक त्रस्त झाल्याची माहिती चिचोर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांनी दिली होती. त्यावरून आरोग्य विभागाची टिमने या तिनही गावात भेटी देऊन नागरीकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. दरम्यान आ. बाबुराव कदम कोहळीकरांनी भेट देत आरोग्य विभागाला सूचना दिल्या. मात्र ग्रामीण भागात अद्यापही जनजागृतीचा अभाव आहे.

तर ताप, अंगदुखी, अगं खाजणे, हातपाय व सांधेदुखी आजार असलेल्या रूग्णांवर उपचार सुरू केले आहेत. त्यानंतर गावात धुर फवारणी करण्यात येत असून, डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे साथीचे आजार वाढले असल्याचे सांगितले जात आहे. तिनही गावात आरोग्य यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली असून, सदरील गावांना जिल्हा आरोग्य अधिकारी संगीत देशमुख यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून तालुका आरोग्य अधिकारी धम्मपाल मुन्नेश्वर, वैद्यकीय अधिकारी देशमुख यांच्यासह आरोग्य विभागाच्या टीमला कडक सूचना केल्या आहेत.

या गावांमध्ये दररोज 12 जनांचे आरोग्य पथक तैनात ठेऊन रूग्ण संख्या नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. वापराच्या पाण्यासह गावातील स्वच्छता, पावसाच्या पाण्याने भरणारे डबके बुजून टाकून नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाणी साठवून ठेवलेली टाकी माठ दररोज स्वच्छ करून घ्यावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. या गावातील साथीचा आज आटोक्यात आला नाही तर हिमायतनगर तालुक्यात संसर्गजन्य आजाराची लागणं होण्याची शक्यता निर्माण झाली असुन, ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्यापही थंड असल्याचे दिसत आहे. जिरोंना‌, गणेशवाडी, गणेशवाडी तांडा येथील डेंग्यू ताप इतर आजारांवर आरोग्य विभागाने तातडीने उपचार सुरू केल्याची माहिती सरपंच प्रतिनिधी बळवंत जाधव, पोलिस पाटील गंगाधर मिराशे व ग्रामसेवकाने दिली आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावपातळीवर आरोग्य सेवीका, आरोग्य सेवक, समुदाय यांनी आरोग्यासाठी जनजागृती करणं गरजेचं असुन, अद्याप एकाही गावात जनजागृती झाली नाही. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी गावोगावी भेटी देणं गरजेचं असुन, त्यांचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, समुदाय अधिकारी यांनी आपल्या उपकेंद्राच्या ठिकाणी मुख्यालयी रहाणं गरजेचे असले तरी तालुक्याच्या ठिकाणी राहून उंटावरून शेळ्या हाकण्याचे करत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी प्रत्येक उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावाला भेटी देणे व आरोग्य शिबीर घेऊन जनजागृती करणं गरजेचं असतांना अद्यापही भेट दिली नसल्याने आरोग्य यंत्रणा कागदावर सुरूअसल्याचे चित्र आहे.

तालुका अधिकारी करतात जिल्ह्यावरून अपडाउन
तालुका आरोग्य अधिकारी यांनी चिचोर्डी‌ प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणारे उपकेंद्र व सरसम प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे उपकेंद्र व उपकेंद्रा अंतर्गत येणारी गावे या गावाला पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने भेटी देणं गरजेचं आहे. मात्र तालुका अधिकारी हे आरोग्य केंद्रासह गावांना भेटी न देता जिल्ह्यावरून अपडाउन करीत कारभार हाकत आहेत. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असुन, याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी लक्ष देणं गरजेचं आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version