कंधार, सचिन मोरे| माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात बाचोटीतून झाली. माजी खासदार शरद जोशी यांची प्रेरणा घेऊन संपूर्ण राज्यात शेतकरी संघटनेची मोठी भक्कम फळी निर्माण केली. प्रस्थापित नेत्यांना धडा शिकवण्यासाठी अनेक वेळेस निवडणुका लढवल्या. शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक दिवस कारावास भोगला.

राजकीय जीवनात चढ- उतार येत असतात मी घाबरणारा कार्यकर्ता नाही कितीही चढ- उतार आले तरी लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद माझा पाठीशी असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण राज्यात व्यापक चळवळ उभी करत शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याची ग्वाही बाचोटी येथील रसाळी कार्यक्रमात माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी दिली.

माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यावतीने बाचोटी तालुका कंधार येथे दि ५ जून रोजी रसाळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, ज्येष्ठ नेते दत्ताजी पवार, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,एकनाथराव मोरे,दिलीप पा. बेटमोगरेकर,संजय पा. कऱ्हाळे,नरहरी वाघ,माधवराव पा. वाघ,श्रीनिवास मोरे, भीमाशंकर कापसे, रंगनाथराव भुजबळ, प्रा. चित्राताई लुंगारे, रामचंद्र येईलवाड, संजय भोसीकार, शिवराज पा.मसलगेकर, दत्तात्रय चंदनफुले, शिवराज पा. धोंडगे, दिलीप दादा धोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना माजी आमदार धोंडगे म्हणाले की सध्या महाराष्ट्र मोठ्या संकटात असून राज्य सरकारवर ८ लक्ष कोटीचे कर्ज आहे. इतर राज्य विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या पुढे असून शेतकरी आत्महत्या बाबतीत महाराष्ट्र देशात नंबर एकचे राज्य झाले आहे. क्राईम वाढती गुन्हेगारी यामुळे महाराष्ट्राचे कसे होणार आहे असा सवाल धोंडगे यांनी करत संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मोठी चळवळ लोक आंदोलन उभे करू असे आवाहन त्यानी यावेळी केले. यावेळी ज्येष्ठ नेते दत्ताजी पवार माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा एकनाथराव मोरे, संजय भोसीकर यांनी धोंडगे परिवाराच्या रसाळी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास बाचोटी व ग्रामीण भागातील शेतकरी, कार्यकर्ते, हितचिंतक व मित्र परिवाराची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version