हदगांव, शेख चांदपाशा| शहरात कोणते ही वाहन कुठे ही उभ करा राग साईड चालवा, ट्रिपल सिट चलवा, भरधाव वेगान चलवा अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. नागरिक शालेय महाविद्यलयीन मुले मुली जीव धोक्यात घालून रस्त्यावर चालवे लागत आहे. शालेय व्यवस्थापन पोलिसाकडे तक्रारी करुन काही एक फरक पडत नसल्याने आता कोणी ही तक्रारी सुद्धा करित नसल्याची स्थिती दिसत आहे. हदगाव नगर परिषद व पोलिसांची समन्वय नसल्याने ही परिस्थिती निर्माण होत आहे.

गेल्या काही वर्षातशहराचा पसारा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. दिवसेंदिवस शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. सोबत पक्के आतिक्रमण शहरात बे-सुमार वाढलेली आहेत. काही आधिका-यांनी अतिक्रमणाला दिलेल प्रोत्साहनामुळे शहरातवाहनधारकांना रोडवरुन वाहन चालविणे जिकारीचे झाले आहे. शहरात वाहतुकीची मोठी कोंडी होतांना दिसुन येत आहे. हदगांव ते नादेड रस्ता, तामसा टी पॉईंट, तहसिल कार्यालय परिसर राठी चौक ते आझाद चौक जुने बस्थानक नवीन बस्थानकाचा परिसर व हदगांव पोलिस स्टेशन समोर इतर ठिकाणी वाहतुकीच बोजवारा उडालेले आहे. या रोडवरुन जाणे म्हणजे नाकीनऊ होत आहे.

शहरातील चौकात व पोलिस बस्थानकात तर पोलिसांची नियुक्ती दिसून येत नाही यामुळे सुसाट वेगाने वाहन चालविणाऱ्यांना कुठलीच भीती नसल्याचे दिसत आहे. निजामच्या काळात जी संख्या पोलिसांची होती. त्यापेक्षा कमी संख्या हदगांव पोलिस स्टेशनला आहेअशी माहीती आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version