बिलोली, गोविंद मुंडकर| दारू पिण्यासाठी पैसे दिले नसल्याच्या जुन्या वादातून देगलूर तालुक्यातील मंडगी येथील मारोती नागोराव जाधव यांचा खून करणाऱ्या गावातीलच दोन आरोपीस बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश ए कोठलीकर यांनी दि.५ जुन २०२५ रोजी जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
देगलूर तालुक्यातील मंडगी येथील रहिवासी मारोती नागोराव जाधव यांचे गावातील मल्लिकार्जुन लोणे व श्रीनिवास लोणे यांच्या सोबत मैत्री होती.या मैत्रीतुन मयत मारोती नागोराव जाधव यास श्रीनिवास लोणे यांनी दारु पिण्यासाठी पैसे मागितले होते. पण मारोती जाधव यांने दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारोती व श्रीनिवास यांच्या मध्ये वाद झाला होता.हा वाद गावातील प्रतिष्ठित नागरिकांने मिटविला होता.मात्र या वादाचा राग मनात धरून अंदाजे महिना भरा नंतर दि.२९ जुलै २०२३ दिवसभर फवारणीला जाऊन सायंकाळी पाच वाजता घरी आला होता.
त्यानंतर सायंकाळी ७-३० ते ८ वाजताच्या सुमारास गावातीलच मल्लिकार्जुन लोणे व श्रीनिवास लोणे हे मारोती जाधव यांच्या घरी येऊन त्यांना सोबत घेऊन बाहेर गेले.बराच वेळ झाला भाऊ घरी न आल्याने फिर्यादी शैलेंद्र जाधव यांनी मल्लिकार्जुन व श्रीनिवास लोणे विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता ते घरी नव्हते.दुस-या दिवशी दि. ३० जुलै २०२३ रोजी सकाळी मयत मारोती जाधव यांच्या बाबत गावातील लोकांना विचार पुस केली असता मारोती जाधव हा काल रात्री ८-३० वाजताच्या सुमारास मल्लिकार्जुन लोणे व श्रीकांत लोणे यांच्या सोबत मंडगी फाटा रोडकडे जाताना पाहीले पण रात्री मल्लिकार्जुन व श्रीनिवास हे दोघेच परत येताना दिसले असल्याचे एका महिलेने सांगितले.
त्यानंतर मी भावाचा शोध घेत असताना सकाळी ७ वाजताच्या सुमारास मारोती जाधव हे मंडगी ते मंडगी फाटा दरम्यान एका शेता जवळील पाण्याच्या डबक्याजवळ मृत अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले.सदर घटनेची पोलिसांना माहिती देऊन मयताचा चुलत भाऊ शैलेंद्र दौलतराव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देगलुर पोलिस स्टेशन येथे आरोपी विरूद्ध कलम ३०२,२०१,५०४,५०६, ३४ भदवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच घटनेचा तपास करुन पोलिसांनी बिलोली न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सदर प्रकरणी एकुण ११ साक्षीदार तपासण्यात आले.
न्यायालयासमोर असलेल्या साक्षी पुरावे व सरकारी अभियोक्त्यांचा युक्तिवाद ऐकून बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी दि. ५ जुन २०२५ रोजी आरोपी श्रीनिवास लोणे व मल्लिकार्जुन लोणे या दोघास कलम ३०२ अंतर्गत जन्म ठेप व कलम २०१ भादवी अंतर्गत १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.