नांदेड। स्वच्छता ही सेवा हा उपक्रम दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा योग्य सन्मान करण्यासाठी, स्वच्छता कर्मचाऱ्यांबाबतचा सामाजिक दृष्टिकोन बदलण्यासाठी तसेच त्यांच्या कामापासून अनेकांनी स्वच्छतेची प्रेरणा घेण्यासाठी सोमवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा अंतर्गत तालुका स्तरावर सफाई मित्र सुरक्षा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी योग्य ते नियोजन करून जास्तीत जास्त सफाई कामगारांचा सन्मान करून त्यांच्या आरोग्याची तपासणी करावी असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

सन्मान सोहळ्यानंतर सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी तालुका रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून या शिबिरामध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी अस्तित्वात असलेल्या सर्व शासकीय योजनांची माहिती देखील देण्यात येणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी समन्वयाने उपक्रमाचे नियोजन करुन हा उपक्रम यशस्वी करावा. या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुकास्तरावर सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना या उपक्रमात सहभागी करावे.

स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत देखील हा उपक्रम घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शक्यतो दोन्ही विभागाचा कार्यक्रम एकत्र एकाच दिवशी घेण्याच्या दृष्टीने नियोजन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमात गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विस्ताराधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत यांनी नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करावी असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version