श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| मौजे केरोळीफाटा ते गुंडवळ-तांदळा मार्गे इवळेश्वर रस्त्याची तात्काळ तात्पुरती सुधारणा करून तूर्तास रहदारी योग्य रस्ता करून मिळणे अन्यथा जन आंदोलन करणार असल्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दहा गावच्या सरपंचासह नागरिकांनी दि 14 रोजी दिल्याने खळबळ उडाली आहे.

माहूर तालुक्यातील अतिदुर्गम आणि एकेकाळच्या नक्षलग्रस्त भागात जाणारा एकमेव रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्याकडे घेऊनही अद्याप दूपदरीकरणासह मजबुतीकरण केलेले नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर पायी चालणे कठीण झालेले आहे. केरोळी फाटा ते गुंडवळ – तांदळा मार्गे इवळेश्वर कुपटी या मार्गावरील रस्त्यावरील पूले तुटली असून रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे परिसरातील तांदळा, गुंडवळ व इतर गावातील नागरिकांना विविध कामानिमित माहूर येथे तालुक्याच्या ठीकांनी ये-जा करण्यासाठी दळणवळण व्यवस्थे करिता इतर कोणताही रस्ता उलपब्ध नाही.

तांदळा, गुंडवळ व परिसरातील अनेक गावातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व आरोग्य सेवेचा लाभ घेण्याकरिता नागरिकांना याच रस्त्यावरून माहूर येथे यावे लागते. परंतु सदरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे ज्यामुळे नागरिकांना सदर रस्त्यावरून ये-जा करतांना खूप मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच अनेक दुचाकीस्वार कसरत करतांना पडून जखमी होत आहेत व त्यामुळे त्यांच्या नियोजित कामांचा खोळंबा होत आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरचे काम मंजूर असून सध्या पावसाळा सुरु असल्याने सदर काम करता येत नाही.

करिता सदरील रस्त्याची तात्काळ तात्पुरती सुधारणा करून नागरिकांना वाहनाने ये-जा करण्यायोग्य रस्ता करून देण्यात यावा ही नम्र विनंती. अन्यथा परिसरातील नागरिकांच्या वतीने जन आंदोलन उभारण्यात येईल याची नोंद घ्यावी. असा धमकी वजा इशारा सरपंचासह नागरिकांनी दिल्याने खळबळ उडाली आहे सदर निवेदनाची प्रत आमदार भीमराव केराम यांनाही पाठविण्यात आली आहे.

या निवेदनावर सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा लखमापूरचे सरपंच गणेश राठोड सौ. दुर्गा संतोष जाधव सरपंच ग्रामपंचायत तांदळा रामेश्वर किसन जाधव सरपंच गुंडवळ प्रविका इंदल राठोड सरपंच पवनाळा वंदना दुधराम राठोड सरपंच ईवळेश्वर सुभाष किसन आडे, महादापूर संतोष जाधव तांदळा गजानन रमेश राठोड सरपंच बोरवाडी प्रफुल बंडू भुसारे सरपंच कुपटी सौ सुलोचना अर्जुन पवार दत्तमांजरी विठ्ठल प्रेमसिंग राठोड गजानन किसन कऱ्हाळे यांचे सह अनेक सरपंच आणि नागरिकांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version