श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर पोलीस ठाण्यात महिनाभरा आधी रुजू झालेले पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी फ्लॅश आउट मोहीम मनावर घेतलेली दिसत असल्याने त्यांनी माहूर तालुक्यातील मौजे कसार पेठ येथे शेतशिवारातील नाल्यात सुरू असलेल्या हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त करून दारू बनविण्याचे फस फसते रसायन सॅम्पल साठी घेत 700 लिटर दारू बनविण्याचे इतर साहित्य जागेवरच नष्ट करून एका विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना दि 13 रोजी सकाळी 8 .22 वाजता घडली आहे.
पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी हातभट्टी दारू बनविणारे तसेच देशी दारू विनापरवानगी विक्री करणारे यासह कुठल्याही प्रकारची अवैध रित्या दारू विक्री होत असल्यास त्यावर कडक कारवाई सुरू केली असून, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आपरेशन फ्लॅश आउट कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी मनावर घेतल्याने गेल्या महिन्याभरात अनेक गुन्हे दाखल झाले. लाखो रुपयांचे दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करण्यात आल्याने अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या मनात धडकी भरली असून, ज्या गावात गुन्हे दाखल झाले त्या गावात आपसूकच दारू विक्री आणि पिणाऱ्यांचे प्रमाण आपसी तंटे कमी झाल्याने कमी झालेले दिसत आहे.
कुठल्याही प्रकारची अवैधरित्या दारू विक्री होत असल्यास नागरिकांनी थेट माझ्याशीच संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केले. सदरील कार्यवाही पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नी संदीप अन्येबोईंनवाड यांनी केली असून दारूचे साहित्य नष्ट करून एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलीस नाईक बाबु जाधव पवन राऊत सोनसळे सोनटक्के यांचे पोलीस कर्मचारी होमगार्ड उपस्थित होते.