श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर येथील श्री.आनंद दत्त धाम आश्रमात दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी गुरु पौर्णिमे निमित्त म्हणजेच दि.१०/०७/२०३५ रोजी दत्त किर्तन व पारायण संपन्न झाले. श्री.आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधीपती राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर यांच्याकडून या पावन पर्वावर समस्त भाविक व अनुयायांसह उपस्थितांना कीर्तनातून दत्तभक्तीचा प्रसाद दिला.
या कार्यक्रमातून वसमतकर महाराज यांनी उपस्थित भक्तांना दत्त नामाचे महात्म्य विस्तृत पणे समजावून सांगितले.रंजल्या गांजल्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा असल्याचे सांगत अध्यात्माला समाजसेवेची जोड द्यावी असे अवाहन त्यांनी यावेळी केले.
गुरुपौर्णिमेच्या पूर्व संधेला महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर स्वच्छतादूत राष्ट्रसंत दभप.साईनाथ महाराज वसमतकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात त्यांनी स्वच्छता,वृक्षारोपण,आरोग्य,शिक्षण व व्यसनमुक्ती बरोबरच भक्ती व दान या सप्तसुत्रीस शिरवंद्य माना असे त्यांनी भक्तांना उपदेश दिला.
यावेळी या गुरुपौर्णिमेनिमित्त असलेल्या सोहळ्यात महीला, अनुयायी, भक्तगण तसेच अनेक भाविक व गावकरी मंडळी भक्तीपूर्वक उपस्थित होती.तसेच या कार्यक्रमास सहकार्य व नियोजन नंदु संतान, आश्रमाचे प्रवक्ते भाऊराव पाटील हडसणीकर, जवाहरलाल जयस्वाल, शेषराव पाटील सर,पुंडलिक हुम्बे,वैभव खराटे, संतोष मते, अविनाश हुलकाने , कलाने, भांगे पाटील, पंजाब माने ,यांनी केले.