नांदेड| राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत मानधन निवडीसाठीची जिल्हास्तरीय समिती पूनगठीत नसल्याने मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिकांच्या मानधनाचे दोन वर्षापासून समिती गठीत नसल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित आहेत. या साठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अतुलजी सावे यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी आग्रही मागणी राजर्षी शाहू महाराज मान्यवर साहित्यिक कलावंत मानधन निवड समितीच्या सदस्या तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नादेड यांच्याकडे निवेदनातून करतानाच याबाबत दुर्लक्ष केल्यास येत्या 14 जुलै रोजी नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्याचा इशारा बहुजन टायगर युवा फोर्स संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे कामारीकर यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सन 2023-24 व 2024-25 या वर्षातील मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन निवडीची प्रक्रिया जिल्हास्तरीय समिती गठीत नसल्यामुळे दोन वर्षापासुनचे प्रस्ताव मागविण्यात आलेले असले तरी त्याची छाननी करून पात्र अपात्र प्रस्ताव करण्यात आलेले आहेत.परंतु राजषी शाहू महाराज साहित्यिक व मानधन निवड समिती पुनर्गठण नसल्यानेच त्याबाबतची कारवाई थंडावली आहे याबाबत संबंधित पंचायत विभागाकडून वारंवार सांगितल्या जात आहे .
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्या निदर्शनास आणून द्यावी सोबतच सदरची समिती पुनर्गठीत व्हावी यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी समितीच्या सदस्य तथा जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आलेले असून या निवेदनाच्या प्रती ना. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,ना.एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,ना.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ना.आशिषजी शैलार सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य,ना.अतुलजी सावे पालकमंत्री नांदेड जिल्हा, मा. जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड, मा. पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड,मा. पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड आदींना पाठविण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद कार्यालयासमोर दिनांक 14 जुलै रोजी होत असलेल्या भजन आंदोलनात जिल्हा भरातील लोक पारंपारिक कलावंत व साहित्यिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष. संस्थापक अध्यक्ष पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ महाराष्ट्र त्रिरत्नकुमार मा.भवरे कामारीकर बहुजन टायगर युवा फोर्स,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष शाहीर शंकरदादा गायकवाड भोसीकर. बहुजन टायगर युवा फोर्सचे जगन्नाथ नरवाडे नादेडकर, के .डी .बेंबरे पाटील यांनी केले आहे.