श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर शहरातील खाजगी शिकवनी घेणारे शिक्षक आणि त्यांच्या विद्यार्थ्याकडून माहूर गडावरील श्री इंजाळा कुंड किल्ला वनदेव देवस्थान आणि कैलास टेकडी येथे स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांना विविध वन औषधी आणि अचानक भेटी झालेल्या जंगली पशुपक्ष्याबद्दल माहितीची देवाण घेवाण करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनात भर टाकण्यात आली.
माहूर शहरातील खाजगी शिकवणी घेणारे शिक्षक आकाश बेहेरे यांच्याकडून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाची आवड निर्माण व्हावी तसेच जंगली पशु पक्षी आणि जनावरांबद्दल माहिती व्हावी या हेतूने दोन दिवसीय स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी आकाश बेहरे यांच्याकडून पवित्र इंजाळा कुंड किल्ला तसेच अति घनदाट जंगलात असलेले वनदेव देवस्थान आणि पवित्र कोरी भुमी म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या कैलास टेकडीवर प्रथम स्वच्छता अभियान राबविण्यात आले तर दुसऱ्या दिवशी या सर्व ठिकाणी जमेल तशा झाडांचे उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जगदंब कोचिंग क्लासेस चे शिक्षक आकाश बेहेरे सरशिक्षक गजानन चुनाळकर सर खुशी निलेश जयस्वाल साक्षी वर्मा, आरुषी महल्ले साई दवणे, पियुश बेहेरे वैभव कांबळे, जय भंडारे, सृष्टी बेहेरे, सानिधी सौदलकर, मयुरी गोडसे योगिराज जाधव, आर्थन गव्हाणे, भावेश बेहेरे, संकेत बेहेरे, स्वराज तुपदाळे, व इतर जण उपस्थित होते.