जानेफळ| नालंदा बुद्ध विहार गोमेधर चारीटेबल ट्रस्ट र. न. १०/६० या ठिकाणी २४ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान भव्य असे श्रामनेर शिबीर संपन्न झाले. या शिबीरात पुज्य भन्ते शिल रत्न थेरो यांनी धम्मदेशना दिली. तसेच चंपालाल शंकरलाल जैन यांनी अमूल्य असे विचार या शिबीरात व्यक्त केले.

मा. चंपालाल जैन म्हणाले की, जगाला शांतीचा संदेश देणारे महा कारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्या त्यागमय जिवनात मानवाला शांती, सुख, समाधान मिळण्याकरिता लागणारे शुभ संदेश आपल्या धम्म विचारांतून दिले आहेत. आपणही सर्वजण आपल्या जिवनात वाईट विचार,अभद्र चाली, रिती, त्यागून चांगल्या विचारांची कास धरावी. वाईटाला आपल्या आजूबाजूला फिरकू देवू नये, आपल्या कार्यात सातत्यानं मेहनत करून आपले भविष्य उज्ज्वल करावे. असे विचार चंपालाल शंकरलाल जैन यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

सदरचे शिबीर यशस्वी करण्यासाठी अशोकराव अवसरमोल, सुरेश सरदार, दत्ता खरात, गिताबाई अवसरमोल आरती सरदार, सरपंच सुभाष अवसरमोल, किशन भुजंग, गणेश सुर्वे, मदनराव होणे, सतिष आधळे, प्रल्हाद अवसरमोल, शंकर अवसरमोल, गौतम अवसरमोल, कैलास अवसरमोल, केशव अवसरमोल, समाधान सरदार, रमेश अवसरमोल, गजानन अवसरमोल, एकनाथ काकडे, विजय अवसरमोल, महादेव सावंत, रतन अवसरमोल, सिद्धेश्वर अवसरमोल, नवनीत साळवे, निलेश अवसरमोल, रिंकू अवसरमोल, संजय अवसरमोल, दिलीप अवसरमोल, प्रल्हाद वानखेडे, संदिप पडघाणे, पुंजाजी अवसरमोल, सुरेश अवसरमोल, भगवान अवसरमोल, श्रीमती निर्मला अवसरमोल, विकास अवसरमोल, गीताबाई सपकाळ, वसंता बोरडे, दिनकर घेवंदे, भिमराव सिरसाठ, भास्कर जाधव, संतोष गवयी, राजकिण खरात, राजेश सपकाळ, भिका सपकाळ, कैलास वानखेडे, विजय कांबळे, किरण ताजणे, जालिंदर वानखेडे, नारायण अवसरमोल, शंकर सरदार, अनिल वानखेडे, संजू खरात, आदिंनी सदरचे श्रामनेर शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न व अमूल्य असे योगदान दिले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version