हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार | येथील पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक ०३ जून रोजी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठकीत संपन्न झाली. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी सांगितले कि, बकरी ईद निमित्त गोवंश जातीचे जनावरे वाहतुक व कत्तलीसाठी विना अन्नपाणी क्रूरतेन बांधून ठेवणे आणि त्यांची कत्तल करून मांस विक्री करणे हे प्राणी संरक्षण कायदयाचे उल्लंघन करणारे आहे. अश्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचे आदेश नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. त्यामुळे कुणीही गोवंश कत्तलीसाठी प्रयत्न करू नये व गोवंशाची वाहतूक करू नये. आणि शासनाने अमलात आणलेल्या कायद्याचा अनादर करू नये. या सूचना केवळ उत्सवा पुरत्या नाहीत तर कायमसाठी आहेत. जर कुणी कायद्याचे उल्लंघन करून गोवंशाची कत्तल अथवा वाहतूक करत असले तर संबंधित व त्यांना सहकार्य करणाऱ्या दोषींवर कडक कार्यवाही केली जाईल असा कडक इशारा श्री भगत यांनी दिला.

तसेच शाळा, कॉलेज, मंदिर रस्त्यावर टुकार, टारगट मुलांनी टवाळखोऱ्या करू नये, शहरातून भरधाव व वेगात  सायलेन्सर काढून फटका वाजवत बुलेट, दुचाकी वाहने चालवू नये, महिला मुलींना त्रास होईल असे वर्तन करू नये असा प्रकार लक्षात अल्यास किंवा कुणाची तक्रार आल्यास संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही होईल. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे असे आवाहनही त्यांनी केलं. या बैठकीला महावीरसेठ श्रीश्रीमाळ, राजवर्धन श्रीश्रीमाळ, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, किशोर रायेवार, विलास वानखेडे, विठ्ठल ठाकरे, रामभाऊ सूर्यवंशी, गजानन हरडफकर, रामू नरवाडे, बाळू अण्णा चवरे, गजानन तुपतेवार, समद खान, आश्रफ भाई, फेरोज खान, बाखी सेठ, सरदार खान, शंकर पाटील, फेरोज कुरेशी, जावेद खतीब, मनान भाई, शेख अफरोज, निकू ठाकूर, शुभम गाजेवार, मंगेश धुमाळे, जितू सेवनकर, पापा पार्डीकर, दुर्गेश मंडोजवार, आदींसह शहरातील शेकडो हिंदू मुस्लिम बांधव व पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस ठाण्यात शुद्ध पाणी फिल्टर बसविण्याची राजवर्धन श्रीश्रीमाळ यांनी केली घोषणा

हिमायतनगर पोलीस ठाण्यात व दक्षिण मुखी हनुमान मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्त व नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी धडपड लक्षात घेऊन नांदेड येथील पुष्पा ज्वेलर्सचे मालक राजवर्धन श्रीश्रीमाळ यांनी नागरिकांची तहान भागविण्यासाठी शुद्ध आणि थंड पेय जल उपलब्ध करून देण्याचा मांसव व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यात शुद्ध पाणी फिल्टर बसविणार आसल्याची घोषणा शांतता कमिटीच्या बैठकीत केली.

त्यांच्या या दातृवत्वाबद्दल पोलीस निरीक्षक अमोल भगत व मान्यवरांच्या हस्ते राजवर्धन श्रीश्रीमाळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अनेकांनी त्यांच्या दानशूरतेबद्दल अभिनंदन केले. यावेळी महावीरसेठ श्रीश्रीमाळ, राजवर्धन श्रीश्रीमाळ, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, किशोर रायेवार, विलास वानखेडे, रामभाऊ सूर्यवंशी, राम नरवाडे, समद खान, फेरोज खान, अश्रफ भाई, सरदार खान, गजानन हरडफकर, जावेद खतीब, मनान भाई, मंगेश धुमाळे, आदींसह शहरातील शेकडो हिंदू मुस्लिम बांधव व पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version