हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार। येथील रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शहरातील बसवेश्वर मंदिर, वरद विनायक मंदिर परिसरात दिनांक 05 रोजी वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तसेच प्रत्येकाने आपल्या जीवनात एक तरी वृक्ष लावावे असे आवाहन सिंधू दीदी यांनी केले.

आज दिनांक 5 जून रोजी सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षाची कत्तल होत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. त्यामुळे पृथ्वीतलावर विविध प्रकारचे संकटे कोसळत आहेत. या सर्व संकटांवर मात करण्यासाठी आणि पूर्ववत ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून प्राणीमात्रांना जीवनदान देण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने एक वृक्ष लागवड करून त्या वृक्षाला मोठं करण्याचा संकल्प करावा असा संदेश देण्यात आला.

हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हिमायतनगर येथील ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी शहरातील विविध धार्मिक स्थळाच्या ठिकाणी वड, बेल,बदाम, पिंपळ आदिसह विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून पर्यावरण वाढीचा संदेश देण्यात आला. यावेळी सिंधू दीदी, भोयर दीदी, अरविंद भाई, गजानन भाई, नंदू भाई, चंदू भाई, विपुल भाई, मेंडके भाई, यांच्यासह अनेक जेष्ठ नगरीत व बालक उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version