दिल्ली। मी मराठा समाजास आरक्षण मिळावे तसेच हा प्रश्न देशाच्या राजधानीत गांभीर्याने घ्यावा, यासाठी लाक्षणीक उपोषणास बसत आहे. अशी पोस्ट फेसबुक या सोशल मीडियावर खा हेमंत भाऊ पाटील यांनी शेअर करून दिल्ली येथील महाराष्ट्र सदन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर लक्षणीय उपोषण सुरू केले आहे.

महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतो. या भागातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात शेती करणारा आहे. नापीकी, वातावरणातील बदल, शेतीला मिळणारा भाव यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. मराठा समाज आज अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये हालाखीचे जीवन जगत आहे. बेरोजगारीमुळे गावा- गावात शेकडो तरुण वैफल्यग्रस्त जीवन जगत असून, अनेक तरुण बिन-लग्नाचे आहेत.

गेल्या सात दिवसापासून मनोज जारांगे-पाटील अन्न-पाणी त्यागुन उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ गावा-गावातून युवक – महिला उपोषणास बसले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लोकसभेच्या व्यासपिठावर मांडणे माझे कर्तव्य असून, यापूर्वी हा प्रश्न मी लोकसभेत अनेकदा उपस्थित केला आहे. या प्रश्नावर महाराष्ट्रातील सर्वपक्षिय खासदाराची बैठकही बोलवली होती. या बैठकीस २३ खासदार उपस्थित होते.

एक या प्रश्नाचे गांभीर्य दिल्लीच्या व्यासपीठावर जाणवावे यासाठी कालच मी लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्लाजी यांच्याकडे माझा राजीनामा दिला आहे. यावर अनेक प्रस्थापीत नेते टीका करत आहेत. मी यावर वाद-प्रतिवाद करून या प्रश्नाचे गांभीर्य घालवू इच्छित नाही. म्हणुन आज मी मौनव्रत धारण करून हे उपोषण करत आहे असे सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version