लातूर| राज्यात विमा योजना अंतर्गत 2023-24 मध्ये कोकणातील आंबा आणि राज्यातील काजू, संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर, 2023 असा होता. त्यास दोन दिवसांची मुदवाढ देण्यात आली असून त्याची वाढीव मुदत4 व 5 डिसेंबर,2023 अशी आहे.

पीक विमा पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे इच्छुक शेतकरी या योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाकडून या दोन दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच कोकण व्यतिरिक्त राज्यातील उर्वरित भागातील आंबा पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर, 2023 तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी कांदा या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 15 डिसेंबर, 2023 असा आहे. या विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version