मुंबई। गेले १० दिवस गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. तर अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईतील प्रमुख चौपाटींवर भक्तांची असंख्य गर्दी पाहायला मिळाली. काही ठिकाणी कालपासून सुरू झालेल्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका दुसऱ्या दिवसापर्यंत सुरू होत्या. अशात चौपाटीवर निर्माल्य आणि इतर कचऱ्याचा प्रश्न दर वर्षी निर्माण होतो. त्यामुळे गणपती विर्सजन झाल्यानंतर गिरगाव चौपाटी येथे जमा होणाऱ्या निर्माल्याची व इतर कचऱ्याची स्वच्छता एनसीसी अधिकारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी राज्य कार्यालयातील कर्मचारी अधिकारी व एनसीसीमधील ५०० मुले व मुली आणि अधिकारी अनेक सभासद सहभागी झाले होते. गणपती विसर्जनानंतर कचरा जमा होतो. त्यामुळे परिसरामध्ये अस्वच्छतेचे चित्र निर्माण होते. त्यामुळे युवकांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी २०० गोण्या निर्माल्य आणि इतर कचरा काढण्यात आला.

या कार्यक्रमाला ब्रिगेडीअर विक्रांत कुलकर्णी आणि माधवाल, कमांडर सतपाल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. तरुण मुलांचा ओढा इंटरनेट, मोबाईल, टीव्ही यांच्याकडे अधिक आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण मैत्री, समाजसेवा यांच्याकडे विद्यार्थ्यांना वळविणे याकरिता विविध सेवा प्रकल्पाचे आयोजन एनसीसीच्या वतीने करण्यात येत असते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version