नांदेड| सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादित जि.प.नांदेड यांची नूतन कार्यकारणी होऊन जवळपास नऊ ते दहा महिने झालेले आहे. या दरम्यान सत्ताधारी संचालक वारंवार नियमबाह्य खर्च नियम बाह्य वारेमाप खर्च आणि छपाई तसेच सहकार अधिनियमांचे उल्लंघन सातत्याने करत आलेले आहेत. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी सहकारी पतपेढीच्या नियमबाह्य कारभाराची चौकशी करण्यासाठी चौकशीचे दिले आदेश दिले आहेत. शिक्षक सेनेच्या मागणी वरून चौकशी अधिकारी अनिल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी दिली.

शिक्षक सेनेने पतसंस्थेच्या कारभारातील रोख शिल्लक हातावर ठेवणे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 चे निर्देशाचे पालन न करणे , महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 मधील नियम 160 चे व 107 चे उल्लंघन करणे, रोख रक्कमेचा व्यवहार करणे, कोणत्याही कागदपत्राची मागणी केली असल्यास कागदपत्राची पूर्तता न करणे, सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 चे पाच ब नियमांचे उल्लंघन करणे, विचारलेल्या रककमांचे तफावत रकमेचा हिशोब न देणे अशा या गंभीर बाबीवर व सातत्याने माहिती न देणाऱ्या सत्ताधारी संचालक यांचा जो नियम बाह्य व्यवहार चालू आहे यावर आक्षेप घेतला आहे.‌ तसेच पतसंस्थेच्या हितासाठी प्रयत्न न करणे, थकबाकी वसूल न करणे, अशा व्यवहाराची चौकशी झालीच पाहिजे असे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नांदेडच्या वतीने मा.जिल्हा उपनिबंधक साहेब यांना दिनांक 5 आक्टोंबर 2023 11 आणि 3 ( दि.12/10/23 चे निवेदन ) असे 14 मुद्यांची चौकशी करावी अशी तक्रार करण्यात आली होती.

त्यानुसार शिक्षक सेनेने दिलेल्या निवेदनाचा विचार करून वरील मुद्द्याच्या आधारे नियमबाह्य व्यवहाराच्या चौकशीसाठी चौकशी अधिकारी नियुक्त केला आहे. तसे 30/10/2023 रोजी आदेश देऊन सर्व मुद्यांची सखोल चौकशी करावी व अहवाल कार्यालयास सादर करावा असे आदेशित केले आहे. याबद्दल शिक्षक सेना पदाधिकारी राज्य उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण राज्य उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, रवी बंडेवार, गंगाधर कदम, मनोहर भंडेवार, अविनाश चिद्रावार , शिवाजी पाटील, बळीराम शिंदे, प्रकाश कांबळे, गंगाधर ढवळे बालाजी भांगे, देविदास जमदाडे, संजय मोरे वसमतकर, संतोष घटकार, बनसोडे राहुल, प्रकाश फुलवरे, रामदास इंदुरे आदींनी आभार मानले आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version