नांदेड| प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत नांदेड शहरात प्रस्तावित संविधान सभागृहाच्या उभारणीसाठी जागेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महापालिकेने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची जागा सुचवली होती. मात्र संबंधित महाविद्यालयाने विविध कारणे देत जागा उपलब्ध करून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेने पर्यायी जागेसाठी जिल्हाधिकार्‍यांना पत्र सादर केले असुन या पार्श्वभूमीवर आज नांदेडच्या विश्रामगृहात जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन सादर करत लवकरात लवकर संविधान सभागृहासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अधिकृत पत्र देत २ हजार चौ. मीटर जागा संविधान सभागृहासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. या पत्रात असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते की, या सभागृहाच्या माध्यमातून तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनाही भारतीय संविधान, कायदे, सामाजिक समस्या, प्रशासकीय बाबी यांचे सखोल ज्ञान मिळेल. तसेच अल्पसंख्यांक समाजाविषयी समता, एकात्मता आणि सहिष्णुतेबाबत प्रबोधन होईल. तथापि, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाने ही संधी नाकारत, जागा देण्यास नकार दिला आहे.

यामुळे केवळ संविधान सभागृहाचाच प्रकल्प अडथळ्यात आला नाही, तर विद्यार्थ्यांना मिळू शकणार्‍या शैक्षणिक व सामाजिक प्रबोधनाच्या सुवर्णसंधीचाही लाभ हुकला आहे. हे संविधान सभागृह हे ग्रंथालय, म्युझियम, ऑडिटोरियम, भारतीय संस्कृतीचा इतिहास, प्रशिक्षण केंद्र, विपश्यना केंद्र, कायद्यानियमांची माहिती, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, आणि भारतीय संविधानाचे सखोल ज्ञान देणारे एक बहुउद्देशीय केंद्र असणार आहे. नांदेड शहरासारख्या ऐतिहासिक व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील परिसरात अशा केंद्राची उभारणी अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

यावेळी राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे, भाजपा संघटन मंत्री संजय कोडगे, महापालिकेचे माजी सभापती किशोर स्वामी, माजी महानगर अध्यक्ष प्रवीण साले उपस्थित होते. दरम्यान संविधान सभागृह ही केवळ एक इमारत नसून, सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे. हे केंद्र संविधानाचा गाभा, कायद्यानियम, सामाजिक समता आणि अल्पसंख्यांक सक्षमीकरणासाठी आधारभूत ठरेल. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य जागा निश्चित करावी अशी मागणी साहेबराव गायकवाड यांनी यावेळी केली.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version