नायगाव, रामप्रसाद चन्नावार| सगर पुत्र महातपस्वी राजा भगिरथ यांची जयंती दि.15 जानेवारी 2024 रोज सोमवार दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी मकर संक्रांतीच्या पर्वावर कोलंबी येथील सर्व सगर समाज बांधव व राजाभगिरथ मंडळ कोलंबी यांच्या पुढाकारातून साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष भिवाजी पाटील शिंदे होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री 108 महंत यदुबन गुरु गंभीरबन महाराज दत्त संस्थान कोलंबी यांचे प्रतिनिधी व्यंकट महाराज व माजी नगरसेवक नांदेड व युवा उद्योजक प्रवीण बियाणी, प्रमुख व्याख्याते राणाप्रतापसिंह चंदावाड सर होते. महातपस्वी राजा भगिरथ यांची जयंती दरवर्षी गावातील सगर बांधव व इतर सर्व समाज बांधवांना एकत्र बोलावून साजरी केली जाते.

प्रमुख व्याख्याते राणाप्रतापसिंह चंदावाड सर यांनी आपल्या पूर्वज काळातील राजा भगिरथ यांचा सर्व इतिहास सांगत असताना राजा भगिरथाने ज्या प्रमाणे आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी महातपस्या करून पृथ्वीतलावर गंगा आणली त्या गंगेचा उपयोग सगर पुत्रानाचं झाला नाहीतर पृथ्वी तलावरील सर्व पशु पक्षी सर्व सजीवसृष्टीला झाला. त्याप्रमाणेच आपण आपला स्वतःचा विकास न पाहता त्याबरोबरच आपल्या आई वडिलांची सेवा व आपल्या समाजा साठी एखादे चांगले कार्य करावे तेंव्हाच आपल्या जयंतीचा उद्देश साध्य होईल असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास उपस्थित गावचे प्रथम नागरिक सरपंच प्रतिनिधी शिवाजी लांडगे, उपसरपंच फेरोज शेख, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानोबा गवाले, शिवाजी शिंदे, धोंडुबाई जयवंतराव बर्लेवाड, नब्बीसाब शेख, साहेबराव मुधळे,सदस्य प्रतिनिधी प्रल्हाद बैस व गावातील प्रतिष्टीत नागरिक बालाजी सोनमनकर (काटकर), गणेश सोनमनकर (देवकर), प्रकाश लांडगे, मनोहर बैस, बबलू बैस,श्रीनिवास सोनमनकर,रघुनाथ पोतलवाड, रघुनाथ घोनशेटवाड,बाबाराव इजलकंठे, दगडू महाराज बर्लेवाड,व समस्त सगर समाज बांधव आणि गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजा भगिरथ मित्र मंडळ कोलंबी अध्यक्ष भगवान कोकुर्ले, उपाध्यक्ष राधाकिशन पोतलवाड, सचिव राजु इजलकंठे, सहसचिव गजानन घोनशेटवाड, कोषाध्यक्ष मारोती बर्लेवाड, सदस्य गोविंद चिंतेवाड, राजाराम कोंडेवाड, गोपाळ घोनशेटवाड, गोविंद सावरगावे, उद्धव मरडे, मनोहर बुरपल्ले व समस्त सगर बांधव. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरसिंग पोतलवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जयवंतराव बर्लेवाड यांनी केले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version