श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| संपुर्ण जागातील बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या बौद्धगया येथील ‘महाबोधी महाविहार’ यावरील बौद्धेत्तरांचा ताबा काढून बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी माहूर येथील धम्मबांधवांनी काल दि. २४ मार्च रोजी माहूर तहसिलदारामार्फत महामहीम राष्ट्रपतींकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असून संपुर्ण भारतासह जगभरातून होत असलेल्या या मागणीला माहूर तालुक्यातील बौद्ध अनुयांयांचा देखील पाठींबा असल्याचे निवेदनातून सांगितले आहे.

भारताच्या महामहीम राष्ट्रपती महोदया यांना तहसीलदार माहूर मार्फत दिलेल्या निवेदनात संपुर्ण जगातील बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान असलेले बौद्धगया येथील ‘महाबोधी महाविहार’ सन १९४९ च्या कायद्यानुसार बौद्धेतरांच्या ताब्यात असून हे महाविहार इतरांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध भिक्कू संघ व बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी ऐतिहासिक महाविहार मुक्ती आंदोलन सुरु आहे म्हटले आहे.

‘महाबोधी महाविहार’ हे युनेस्को नुसार विश्वधरोहर असून सन १९४९ मंदिर कायद्यानुसार बौद्धेतरांच्या ताब्यात असल्याने हे संपूर्ण जगभरातील बौद्ध अनुयायी बांधवावर अन्याय आहे, त्यामुळे संपुर्ण भारतभर पेटलेल्या या आंदोलनाला माहूर ता. जि.नांदेड महाराष्ट्र येथील बौद्ध अनुयायी सक्रीय पाठिंबा देत असून महाबोधी महाविहार बाबत करण्यात आलेला सन १९४९ चा मंदिर अॅक्ट रद्द करून पूर्णपणे बौद्ध भिक्कू संघ व बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

निवेदनावर प्रामु्ख्याने भिक्कूणी आर्याजी खेमा यांच्यासह सर्वधर्मीय विवाह मेळाव्याचे प्रमुख प्रकाश गायकवाड, डॉ. झनक मानकर, मनोज किर्तने, रेणूकादास वानखेडे, विजय भगत, सिद्धार्थ तामगाडगे, आकाश कांबळे, राजेश मगरे, प्रविण बरडे, विक्रांत भगत, प्रतिक कांबळे, आदेश लांडगे, गौतम खडसे, अमृत जगताप, सुशिल रणवीर, सिद्धार्थ भवरे, त्रिशरण आठवले, धम्मपाल मुनेश्वर, हिरामण वाघमारे, संजय मानकर, दिपक मुनेश्वर, देवानंद भालेराव शे. रफीक शे. अली. दिपक कांबळे, शामराव राऊत, समाधान कांबळे तसेच गणेश खडसे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्ष-या आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version