नादेड| येथील भारतीय पिछडा शोषित संघटनचा स्मृतिशेष प्रा. हरी नरके राज्यस्तरीय फुले आंबेडकरी विचारधारा साहित्य पुरस्कार प्रथितयश कादंबरीकार प्रा. अशोक कुबडे यांच्या गोंडर या कादंबरीला जाहीर झाला असून, या पुरस्काराचे वितरण राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या औचित्याने रविवार 29 जून रोजी रोजी शहरातील हॉटेल विसावा पॅलेस येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

याच कार्यक्रमात सुप्रसिद्ध विचारवंत प्रा.डॉ. आनंद इंजेगावकर याचे ’भारतीय सविधान आणि सामाजिक न्याय’ या विषयावर व्याख्यान होणार असल्याची माहिती संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीच्या वतीने देण्यात आली. येथील पिछडा शोषित संघटन, लसाकम, सप्तरंगी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेतील सातवे पुष्प सकाळी 11 वा. परभणी येथील आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. आनंद इंजेगावकर हे गुंफणार आहेत.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीपीएसएसचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. सुदाम चिंचाणे हे राहणार असून नामदेव आईलवाड, एस. जी. माचनवार, लक्ष्मण क्षीरसागर, लक्ष्मण लिंगापुरे, नंदकुमार कोसबतवार, गोविंदराम शूरनर यांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक कालवश गिरजाजी माचनवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिशेष प्रा. हरी नरके राज्यस्तरीय फुले- आंबेडकरी विचारधारा साहित्य पुरस्कार येथील प्रथितयश कादंबरीकार अशोक कुबडे यांना गोंडर या कादंबरीसाठी मसापचे नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजी ईबितदार, भूमन्ना अक्कमवाड, बालाजी थोटवे, रुपाली वागरे वैद्य, प्रज्ञाधर ढवळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सतिश शिंदे, श्रीमंत राऊत, राजेश चिटकूलवार, लक्ष्मण कोंडावार, दिलिप काठोडे, गोविंद फेसाटे, नागोराव डोंगरे, अनुरत्न वाघमारे, बाबुराव कापसे, शंकर गच्चे, सदाशिव यनवळ, पांडुरंग कोकुलवार, लक्ष्मण पंदिला, रणजित गोणारकर, संजय मोरे, माधव कांबळे, निरंजन तपासकर, यादव वाघमारे, एन.व्ही. वंगावार, कैलास धुतराज, मारोती कदम, ओमेश पांचाळ, शंकर सोनवणे, व्ही.एन. जाधव, राजाराम राठोड, बालाजी यशवंतकर, प्रदिप राठोड, रमेश माळगे, दादाराव गडगिळे, मारोती लुटे, दत्ता चापलकर, विनोद सुत्रावे, संजय पेटकर, सुनील डोईजड, संतोष औंढेकर, मुंजाजी काकांडीकर, संतोष तेलंग, शिवशंकर पिंपळे, चंद्रकांत रोडे, बालाजी नारे, प्रकाश उराडे, माणिक वाखरडे आदींनी केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version