नागपूर। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यावर्षी 15, 16 आणि 17 मार्च 2024 रोजी विदर्भातील नागपूर (महाराष्ट्र) येथील ‘स्मृतिभवन’ परिसर , रेशिमबाग येथे होणार आहे. बैठकीत 2023-24 च्या संघाच्या कार्याचा आढावा आणि आगामी वर्षाच्या (2024-25) संघाच्या कार्य आराखड्यावर चर्चा होणार आहे .

यासोबतच पूजनीय सरसंघचालकांसह अन्य सर्व अखिल भारतीय कार्यकर्त्यांचा प्रवास , स्वयंसेवक प्रशिक्षणासाठी संघ शिक्षा वर्गांच्या नव्या योजनेच्या कार्यान्वयनाबाबत विचार होईल . संघाच्या शताब्दीनिमित्त कार्य विस्तार योजनेच्या बळकटीकरणा सोबतच विशेषतः आगामी शताब्दी वर्षाच्या उपक्रमांवर चर्चा होईल . प्रतिनिधी सभेत देशाच्या सद्यस्थितीचा विचार करून , महत्त्वाच्या विषयांवरही प्रस्तावही पारित केले जातील.

संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा दरवर्षी देशाच्या विविध भागात आयोजित केली जाते. दर तिसऱ्या वर्षी तिचे आयोजन नागपुरात केले जाते . प्रतिनिधी सभेत 45 प्रांतातील 1500 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. प्रतिनिधी सभेच्या बैठकीत पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत , मा. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले , सर्व सह सरकार्यवाह , अखिल भारतीय कार्यकारिणी , क्षेत्र आणि प्रांत कार्यकारिणी , संघाचे निवडून आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी , सर्व विभाग प्रचारक तसेच विविध संघटनांचे निमंत्रित कार्यकर्ते सहभागी होतील अशी माहिती सुनील आंबेकर अखिल भारतीय प्रचार प्रमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version