नायगाव, रामप्रसाद चन्नावार। आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थिनींनी आपल्या शैक्षणिक विकासासाठी वक्तृत्व, लेखन, संवाद , वाचन कौशल्य व कला गुणांना विकसित केले पाहिजे या अनुषंगाने शरदचंद्र महाविद्यालयातील महिला समितीच्या वतीने नवदुर्गा भित्तिपत्रके व दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

नवदुर्गा भित्तिपत्रकामध्ये विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रातील महिलांचे कार्य व योगदान या विषयावर नऊ भित्तिपत्रिकांचे वाचन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य के. हरिबाबू हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव प्रा. रवींद्र चव्हाण हे होते यामध्ये आपण व्यक्तिगत विकासासोबत सामाजिक विकासाचेही भान ठेवले पाहिजे अशा भावना प्रा. रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलनाने उत्सवाची सुरुवात झाली यावेळी परीक्षक म्हणून डॉ. राऊत एस. डी .हे होते तर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी यामध्ये सहभाग घेतला व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

याच सोबत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या दांडिया उत्सवांमध्ये सर्व विद्यार्थिनींनी दांडिया वेशभूषेमध्ये सहभाग नोंदवला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला समितीतील प्रमुख डॉ. वाडेकर एस. बी., प्रा. पांगरकर एम. एच .,डॉ. राऊत खेडकर एम. एस., प्रा. जकावाड ए. एल, प्रा. धर्मेकर दिपाली आणि शिक्षकेतर कर्मचारी श्री. संतोष भालेराव, श्री.देवीदास भाकरे व श्री. विश्वनाथ बेळगे यांनी परिश्रम घेतले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version