नांदेड। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 02 ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी “स्वच्छ भारत दिवस 2023” च्या निमित्ताने 15 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असून, दिनांक 01ऑक्टोबर 2023 रोजी देशभरात प्रत्येक गावात व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती सहभागी होऊन स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिली आहे.
“स्वच्छता ही सेवा 2023” ची थीम “कचरामुक्त भारत”आहे. यामध्ये “दृष्यमान स्वच्छता” व “सफाईमित्र कल्याण” यावरती लक्ष केंद्रित केले असून, 1 आँक्टोबर रोजी ग्रामीण भागातील बसस्थानक, पर्यटन स्थळे, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले, सर्व कार्यालये आदी सार्वजनिक ठिकाणी शहरी व ग्रामीण भागात ही संयुक्त मोहीम असेल, याबाबत सविस्तर निर्देश सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी, सर्व विभाग  प्रमुख यांना देण्यात देण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व गावात गावकऱ्यांच्या सहभागातून श्रमदान करावयाची ठिकाणे प्रत्येक गावात निश्चित करण्यात आली असुन, प्रत्येक गावात एक ऑक्टोबर रोजीची महाश्रमदान मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी एक दिवसातील एक तास आपल्या गावाच्या स्वच्छतेसाठी द्यावे व आपल्या गावात राबविण्यात येणाऱ्या महाश्रमदान मोहीमेत मोठ्या संख्येने सहभागी होवून आपले गाव, गावाचा प्रत्येक परिसर स्वच्छ करण्याचे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मुक्काम, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, जिल्हा पशुसंवर्धन आधिकारी डॉ.  भूपेंद्र बोधनकर आदींनी केले आहे.
Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version