हिमायतनगर,अनिल मादसवार। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने मुख्यमंत्री आपली शाळा सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण राज्यात राबवीले होते. त्यामध्ये एकून 30 निकष ठेवून त्यांचे गुणांकन तालुका व जिल्हास्तरावरील अधिकारी वर्गाकडून करण्यात आले होते. या उपक्रमांत गुरुकुल इंग्लीश स्कूल हिमायतनगर ने 3 लाखाचे प्रथम बसीस पटकावित प्रथम क्रमांक मिळविला आहे. लवकरच शाळेला बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

सदरील उपक्रमात शाळेचे मुख्य सचिव व कार्यवाह डॉ. मनोहर राठोड, श्री विजय जाधव (मुख्याध्यापक) यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षीका व विद्यार्थ्यांनी या अभियानात भाग घेऊन अथक परीश्रम घेतलं. या स्पर्धेत जिल्हा परीषद शाळेचा एक गट आणि खाजगी शाळेचा एक गट निर्माण करण्यात आला होता. त्या प्रत्येक गटातून तालुका व जिल्हा स्तरावरून प्रथम, द्वितीय, तृतीय नंबर काढण्यात आले आहे.

प्रथम येणाऱ्या शाळेला लिन लाखचे विजेता बक्षीस जाहीर करून शाळेला देण्यात येणार आहे. सदरील अभियानासाठी शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्याचे मार्गदर्शन लागले. अगदी नवीन उपक्रम व कमी वेळात निकषांची पूर्तता करायची होती. यासाठीन शिक्षक, विद्यार्थ्यांनी अनक परिश्रम घेऊन शाळेचे नांव उज्वल केले त्याबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री शिवाचार्य साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री अरुण पाटील सर, श्री धमणे सर, श्री कपाळे सर, श्री अहिरवार सर यानी मुख्याधापक व गुरुकुल इंग्लिश स्कुल टिमचे अभिनंदन केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version