उस्माननगर। राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून कंधार तालुक्यातील उमरज येथे एकात्मिक पाणलोट विकास व हवामान बदल अनुकूल प्रकल्प ( सि. सि. ए प्रकल्प ) कार्यरत असून या प्रकल्पाच्या माध्यमातून दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य विमा योजनेतून मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गावातील गरजू रुग्णांनी आरोग्य तपासणी करून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरज नगरीच्या सरपंच जयश्रीताई जनार्धन केंद्रे या होत्या .तर प्रमुख पाहुणे म्हणून गणपंत शिवाजी राठोड , व्यंकटराव गायकवाड , डॉ. केद्रे ( उपकेंद्र प्रा. आ.उमरज ) ,रुग्णांची तपासणी करण्यासाठी व मार्गदर्शनासाठी आरोग्य तपासणी शिबिरास संजिवनी हाॅस्पीटल नांदेड येथील डॉ. शुभम जैस्वाल , डॉ. पांडुरंग कवटीकर , जेलब सीडम , पद्माकर पाटील ,आशा हाॅस्पीटल नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पुजा भगत डॉ. साहेबराव वाघमारे ,शिवम शिंदे , नागेश कदम राजहंस ढवळे व जोशी (PRO ) यांची उपस्थिती होती.यावेळी प्रमुख पाहुणे यांचा शाल हार घालून स्वागत,सत्कार करण्यात आला.
पात्र रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. संजविनी हाॅस्पीटल ,व आशा हाॅस्पीटल नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक गंगाधर कानगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. तर निवृत्ती जोगपेटे यांनी सुत्रसंचालन केले. आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रदीप कुमार काळबा भिसे ,इर्षद सय्यद , राहुल सिताराम तोरणे, यांच्या सह आदींनी परिश्रम घेतले . ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामपंचायत कार्यालय उमरज यांनी सहकार्य केले.