नांदेड। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातील शिवाजी नगर शाखेच्या एसबीआय बँके समोर ता.१२ रोजी दुपारी एक वाजता तीव्र निदर्शने करून व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे मोदी सरकारने केलेला निवडणूक रोखे कायदा हा संविधान मोडणारा आहे, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यालयाने दिला होता. कुठल्या राजकीय पक्षाला कुणी किती निधी दिला याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने ६ मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला द्यायची होती. निवडणूक आयोगाने ती संपूर्ण माहिती आपल्या वेबसाईटवर १५ मार्चपर्यंत जाहीर करावी, असाही निकाल दिला होता.

ही माहिती एसबीआय सहज देऊ शकते परंतु ३० जूनपर्यंत देता येत नाही, असे स्टेट बँकेने ५ मार्च रोजी जाहीर केले आहे. मोदी सरकारच्या दबावाखालीच बॅंकेने हा निर्णय घेतला आहे. निवडणूक रोख्यांच्या (इलेक्ट्रॉल बॉण्ड) माध्यमातून बेकायदेशीर रित्या हजारो कोटी रुपये जमा झाले आहेत. ही माहिती जनतेपासून दडपण्याचा प्रयत्न स्टेट बँक ऑफ इंडिया करीत आहे. विशेषतः ही बँक जनतेच्या मालकीची आहे.

बॅंकेचे व्यवस्थापन मोदी सरकारच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालत आहे. यासाठी बॅंकेच्या व्यवस्थापनाचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष देशभर तीव्र निषेध करीत निदर्शने आंदोलन करीत आहे.त्याचाच भाग म्हणून माकप आणि मित्र पक्ष – संघटनांनी नांदेड शहरातील एसबीआय शिवाजी नगर शाखे समोर निषेध आंदोलन करीत तीव्र निदर्शने केली आहेत.

मा.सर्वोच्च न्यायाल्याने काल पुन्हा स्टेट बँकेस कडक शब्दात फटकारले असून सर्व माहिती तुम्ही मुंबईच्या मुख्य कार्यालयास पाठवू दिली आहे परंतु निवडणूक आयोगाला का दिली नाही,ती तात्काळ देण्यात यावी कॉ.विजय गाभने, राज्य सचिव मंडळ सदस्य माकप म.रा.कमिटी

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे असे आदेश मा.सर्वोच्च न्यालयाल्याने दिले आहेत.आणि ते आदेश नाकारणे म्हणजे एसबीआय ने न्यायालयाचा अवमान केल्या सारखे आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने इलोक्ट्रॉल बॉण्डच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.स्टेट बँक ऑफ इंडिया मोदींच्या दडपशाहीस बळी पडली आहे. कॉ. गंगाधर गायकवाड , माकप,सचिव नांदेड तालुका कमिटी

या आंदोलनाचे नेतृत्व माकप राज्य सचिव मंडळ सदस्य तथा मराठवाड्याचे माकप नेते कॉ.विजय गाभने,जिल्हा सचिव मंडळ सदस्या कॉ.उज्वला पडलवार, जिल्हा कमिटी सदस्य तथा तालुका सचिव कॉ. गंगाधर गायकवाड,सीटू राज्य कमिटी सदस्या तथा पक्षाच्या तालुका कमिटी सदस्या कॉ.करवंदा गायकवाड, जमसंच्या नांदेड तालुका अध्यक्षा तथा तालुका कमिटी सदस्या कॉ.लता गायकवाड, तालुका कमिटी सदस्य कॉ.श्याम सरोदे, कॉ.जयराज गायकवाड, होकर्स युनियनचे अध्यक्ष कॉ.मारोती केंद्रे, कॉ.बंटी वाघमारे कॉ.मंगेश वटेवार आदींनी केले.कॉ. विजय गाभने आणि कॉ.गंगाधर गायकवाड यांनी आंदोलकांना संबोधित केले.

यावेळी गगनभेदी घोषणा देत एसबीआय हाय हाय, हुकूमशाही नहीं चलेगी अशा गगनभेदी घोषणा देत स्टेट बँक ऑफ इंडिया परिसर दणानून सोडला होता. माकप शिष्टमंडळाच्या वतीने बँकेचे व्यवस्थापक श्री राऊत यांना निवेदन देण्यात आले.शिवाजी नगर पोलीस स्थानकाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त बँक परिसरात तैनात करण्यात आला होता.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version