कंधार,सचिन मोरे। भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा भा.ज.पा किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य दत्ताभाऊ शेंबाळे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांची नुकतीच दि.२८ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा,प्रदेश कार्यकारिणी सचिवपदी निवड करण्यात आली आहे,

शेंबाळे यांचे जन्मगाव हे कंधार तालुक्यातील फुलवळ असून ते भाजपाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी गट नेते एकनाथ दादा पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात एक वेगळी ओळख आहे,गेल्या अनेक वर्षापासून ते भाजपात सक्रिय असून लोहा-कंधार मतदार संघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.

सर्व सामान्य जनतेला न्याय मिळावा या करिता त्यांनी सातत्याने, सत्याग्रह,मोर्चा आंदोलने केले आहेत,शेंबाळे यांच्या निवडीबद्दल एका निष्ठावंत कार्यकर्त्यास न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया आणि एक जणांनी व्यक्त केल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अखंडपणे प्रयत्न केले. त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने असलेल्या विविध योजना,अनेक उपक्रम अतिशय तत्परतेने ग्रामीण भागातील तळागाळातील वाडी तांड्यावरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट रित्या प्रयत्न केले.

केंद्र व राज्यातील सरकारच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून लाभ मिळवून देण्यासाठी शेंबाळे यांनी प्रामाणिकपणे कार्य केले. त्यांच्या पक्षातील कार्याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशानूसार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मान्यतेने व विक्रांतजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्या स्वाक्षरीने सदर निवड करण्यात आली.

दत्ताभाऊ शेंबाळे यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा राज्य सचिव पदी निवडी बद्दल देविदास महाराज गीते, केरबा सावकार बिडवई,व्यंकट गव्हाणे,शिवसांब देशमुख,प्रकाश दळवी, केरबा केंद्रे,साहेबराव काळे, बालाजी पाटील पवार,रामेश्वर पाटील पवार, गजानन पाटील मोरे,तुळशीराम लुंगारे,असंख्य चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार,आ. राम पाटील रातोळीकर, आ. राजेश पवार,आमदार तुषार राठोड,आ.भीमराव केराम,भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, संघटन मंत्री संजय कौडगे यांच्यासह भाजपा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पक्ष लोहा कंधार विधानसभा मतदार संघातील गाव-वाडी तांड्यावर पक्षाचे विचार पोहोचणार असल्याची असल्याचे मत नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चे प्रदेश सचिवदत्ता भाऊ शेंबाळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version