हिमायतनगर/नांदेड,अनिल मादसवार| चुलीत गेले नेते.. चुलीत गेला पक्ष…सर्वच राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी केलेली आहे. कोणतेही राजकीय पक्षांचे अधिकृत कार्यक्रम मराठा आरक्षणवर मार्ग निघत नाही तो पर्यंत होऊ देणार नाही, जर घेतले तर ते उधळून लावण्यात येतील असा इशारा हिमायतनगर आणि आंदेगाव येथील सकल मराठा समाजाने दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. तो संपल्याने आता जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यानंतर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर सह अनेक गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये हिमायतनगर येथील मराठा समाजाच्या युवकांनी शहरामध्ये राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी केलेली आहे. तसेच कोणतेही राजकीय पक्षांचे अधिकृत कार्यक्रम मराठा आरक्षणवर मार्ग निघत नाही तो पर्यंत होऊ देणार नाही असा इशाराही सकल मराठा समाज बांधवानी दिला आहे.
“आंदेगाव येथे राजकिय पुढाऱ्यांना गावबंदी….
नांदेडच्या पावडेवाडी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्यात आली. गाव बंदीचा फलक देखील गावात लावण्यात आला. त्यासोबत गावकऱ्यांनी नेत्यांना गावात येऊ न देण्याची शपथ घेतली आहे.