मुंबई| गणेशोत्सव काळात राज्यामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसची 6 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 2186 दोषी आढळलेल्या खाजगी बसेसवर कारवाई करून एकूण 93.96 लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडे दराच्या 50 टक्के अधिक राहणार नाही, अशा पद्धतीने कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. मात्र शासनाने विहीत केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी तपासणी करून दोषी वाहनांविरूद्ध प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कारवाई करतात. तसेच क्षेत्रीय कार्यालयातील वायुवेग पथकांमार्फतसुद्धा कारवाई करण्यात येते.

राज्यात 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत 41 हजार 234 अवैध प्रवासी वाहतूक करणारी खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 11 हजार 148 वाहने दोषी आढळले. या कारवाईत 440.26 लक्ष इतका दंड वसूल करण्यात आला. तसेच 207 परवाने निलंबित करण्यात आले, असल्याचे . परिवहन आयुक्त सुभाष धोंडे यांनी कळविले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version