नांदेड| जिल्हा उद्योग केंद्र नांदेड कार्यालयात जुने, निरुपयोगी व कालबाहय झालेली उपकरणे इत्यादी भंगार झालेल्या सामानांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. विल्हेवाट करावयाचे सामान हे कार्यालयात पडून असून सामानांची विक्री करण्यात येणार आहे. इच्छुकांनी कार्यालयात प्रत्यक्ष येवून सामानांची पाहणी करावी.

विक्री करण्यात येणाऱ्या सदरच्या सामानाच्या पाहणीसाठी प्रत्यक्ष कार्यालयात सकाळी 11 ते सायं 5 वाजेपर्यंत हे निवेदन प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या मुदतीपर्यंत पाहता येईल. कार्यालयाचा पत्ता जिल्हा उद्योग केंद्र, पहिला मजला उद्योग भवन शिवाजीनगर नांदेड-431602 आहे. सदरील वेळेत येणाऱ्यांचा विचार केला जाईल तद्नंतर निविदा पद्धतीने सदर साहित्याची विक्री करण्यात येईल.

सदरचे साहित्य जसे आहे तसे खरेदी करावे, उपकरणे हस्तांतरीत केल्यानंतर, उपकरणात काही दोष आढळल्यास हे कार्यालय त्यास जबाबदार राहणार नाही. वाहतूक, जकात इ. खर्च संबंधीतास करावा लागेल, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version