नागपूर| राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले,प्रवासी संघटना शेगांव शेखर नागपाल यांच्या प्रयत्नाना यश:कोकणातून शेगांवला जाणाऱ्या गजानन महाराज भक्तांची मागणी पुर्ण खान्देश, विदर्भ ते कोकण जोडणाऱ्या आणि कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ०११३९/०११४० नागपूर मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट बी विकली एक्स्प्रेसला ४ ऑक्टोबर पासून थांबा देण्यात आला आहे. कोकणातून शेगांवला जाणार्‍या भक्तांची मागणी या थांब्यामुळे पुर्ण झाली आहे.

विदर्भातील शेगांव येथील गजानन महाराज संस्थानची विदर्भ पंढरी म्हणून ओळख आहे. गजानन महाराज संस्थान कडुन देण्यात येणार्‍या सोयी-सुविधा,शिस्त,पारदर्शी कारभार यामुळे येथे भाविकांची सदैव गर्दी राहते. राज्याच्या विविध भागातून तसेच देशभरातून भाविक शेगांवला येतात. त्यात विदर्भ कोकण जोडणाऱ्या ०११३९/०११४० नागपूर मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट बी विकली एक्स्प्रेसला ४ ऑक्टोबरपासून शेगांव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version