नांदेड। मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी आंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना या छोट्याशा गावात मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेला लढा आता निर्णायक टप्प्याकडे आलेला आहे .
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसाचा अवधी दिला होता,14 ऑक्टोंबर रोजी 30 दिवस संपणार आहेत आणि 24 ऑक्टोबर रोजी सरकारने मागून घेतलेला वेळ हा पूर्णतः संपत असुन तत्पूर्वी दहा दिवस पहिलेच सरकारला आपण मागून घेतलेल्या वेळ संपत असल्याची जाणीव करून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्यांच्या कमिटीनी व अंतरवाली सराटी गावकऱ्यांनी प्रचंड मोठ्या सभेचे आयोजन केले असुन सदरील महा मेळाव्यासाठी जवळपास तीनशे एकर जमीन ही पार्किंग आणि सभेसाठी तयार करण्यात आली असुन याठिकाणी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून समाज बांधव येत आहेत.
दि.14 ऑक्टोंबर रोजी आयोजित केलेल्या महा सभेच्या पूर्व नियोजनासाठी काल दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक अंबड चे तहसीलदार श्रीयुत शेळके साहेब व नियोजन समितीच्या गावऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सभास्थळी पार पडली असून, सदरील बैठकीला नांदेड जिल्ह्यातील श्याम पाटील वडजे यांच्या सह काही समाज बांधव उपस्थित होते.या बैठकीत चर्चा करीत असताना लाखों च्या संख्येने समाज बांधव आंतरवाली सराटी या ठिकाणी महामेळाव्यासाठी जमणार असा अंदाज बांधण्यात येत असून त्या दृष्टीने आता नियोजन चालू आहे.वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या असुन प्रत्येकाची जबाबदारी ही वाटून देण्यात आली.
असे आवाहन आजच्या सभास्थळी मैदानावर पार पडलेल्या बैठकीतून करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातून जवळपास दीड हजार मराठा सेवक या महामेळाव्यात स्वयंसेवकाची भुमिका बजावणार आहेत त्यात प्रकर्षाने महिलांची संख्या सुद्धा लाक्षणिक असणार आहे. त्यासाठी तशी रीतसर पूर्व नोंदणी आवश्यक असुन, त्याकरिता समाज बांधवांना आवाहन करण्यात येते आहे की कृपया आपण खालील क्रमांकावर संपर्क साधुन आपली नाव नोंदणी करावी.
पुरुष स्वयंसेवकांनी बालाजी कदम 9763686777, सुभाष शिंदे 9175487000, माधव घोगरे 9423188136आणि नाना वानखेडे 9730939963 या क्रमांकावर फोन करून नोंदणी करावी आणि लाखोंच्या संख्येने या ऐतिहासिक महामेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.