नांदेड। बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. सशक्त समाज निर्मितीसाठी बालविवाह हा मोठा अडसर असून सामाजिक जबाबदारीचे भान प्रत्येकाने ठेवून बालविवाह जर कुठे होत असतील तर ते रोखण्यासाठी हिरीरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन नांदेड उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तहसिल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा महिला बाल‍ विकास अधिकारी आर.आर. कांगणे, नेहरु युवा केंद्राच्या समन्वयक चंदा रावळकर, बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, शिक्षण विभागाच्या सविता अवातिरक, युनिसेफच्या प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, जिल्हा समन्वयक अरुण कांबळे, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठानचे जगदिश राऊत यांची उपस्थिती होती.

शासनाच्यावतीने महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत असून याबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय राज्यशासन घेत आहे. आंतरराराष्ट्रीय बालिका दिन व नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुलींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने लेक लाडकी योजना राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाखो मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे. विविध योजनाच्या माध्यमातून भर देण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सांगितले.

जिल्ह्यात कुठेही बालविवाह होवू नयेत. बालविवाह होत असल्याचे आढळल्यास तात्काळ रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशिल राहावे, असेही त्यांनी आवाहन केले. त्यांनी उपस्थितांना बालविवाह निर्मूलनाची शपथ दिली.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version