नरसी/नायगाव। कृतज्ञता माता पित्याची या उपक्रमांतर्गत श्रीमान विठ्ठलराव आणि सौभाग्यवती राजाई बुद्धलवाड यांच्या 50 व्या सुवर्ण महो. विवाह सोहळ्याचे औचित्य साधून समाजधुरीण पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

दि. 24 मे 2024 साय. 7.00 रोजी मौजे. गागलेगाव ता. बिलोली येथे शेतीनिष्ठ शेतकरी श्रीमान विठ्ठलराव आणि झुंजार सौभाग्यवती राजाई बुद्धलवाड, गागलेगावकर यांच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी विवाह सोहळा साजरा करण्याचे बुद्धलवाड परिवार आणि गावकरी मित्र मंडळ यांनी ठरवले आहे.

याचेच औचित्य साधून, कुटुंब व्यवस्था जपणारे आणि समाजाचा आरसा म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात अग्रेसरपणे कार्यरत माध्यम प्रतिनिधींचा, माध्यम क्षेत्रातीलच मागील 35 वर्षापासून कार्यरत असणारे ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव मुंडकर तसेच राजकारणातील पंचायत समिती, बिलोलीचे मा. सभापती मा.शंकरराव परसुरे तसेच आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती, नायगावचे डॉ. हणमंतराव कटके या मान्यवर यांच्या हस्ते माध्यम प्रतिनिधींचा शाल, श्रीफळ, मिठाई आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. अशी माहिती अ‍ॅड. नागनाथ बुद्धलवाड (गागलेगावकर) यांनी दिली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version